Beed Crime : टपरीवर गाठलं अन् मित्रानेच मित्राचा गेम केला, बीडमधील हत्येचा LIVE VIDEO
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
बीडमध्ये तीनच दिवसांपूर्वी एका मित्राने एका मित्राची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना घडली होती. यश देवेंद्र ढाका (वय ,२२ रा. बीड) असे या मृत तरूणाचे नाव होते. बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स भागात ही धक्कादायक घटना घडली होती.
Beed Crime News : सुरेश जाधव, बीड : बीडमध्ये तीनच दिवसांपूर्वी एका मित्राने एका मित्राची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना घडली होती. यश देवेंद्र ढाका (वय ,२२ रा. बीड) असे या मृत तरूणाचे नाव होते. बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स भागात ही धक्कादायक घटना घडली होती. जुन्या वादातून ही हत्या केल्याची माहिती समोर आली होती.या घटनेच्या अर्ध्या तासात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुरज आप्पासाहेब काटे (वय २१, रा. बीड) या आरोपीला अटक केली होती. आता या हत्येचा लाईव्ह व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून अंगावर काटा येतोय.
व्हिडिओमध्ये काय?
व्हिडिओमध्ये पोरांची टोळी दहशत माजवताना दिसते आहे. सुरूवातीला सुरज काटे घटनास्थळी येताच यश ढाका आणि त्याच्यासोबतची मुले पळ काढताना दिसतात.पण या दरम्यान सूरज काटे यश ढाकेला पकडतो आणि रस्त्याच्या कडेला आणतो. त्यानंतर तो खिशात बाळगलेला चाकू बाहेर काढतो आणि यशच्या छातीत घुसवतो.या दरम्यान काही मित्र सुरजला रोखण्याचा प्रयत्न करतात. पण तो काही एक ऐकत नाही.यासोबत इतर नागरीक देखील रस्त्यावरून प्रवास करत आहेत,पण ते देखील या मुलाला रोखताना दिसत नाही आहे. त्यामुळे हा हत्येचा थरार पाहून घाम फुटतोय.
advertisement
नेमका घटनाक्रम काय?
मृत यश ढाका आणि सूरज काटे हे दोघे चांगले मित्र होते. महिन्याभरापुर्वीच या दोघांची एका बर्थडे पार्टीत वाद झाला होता. या वादानंतर दोघांमध्ये कटूता आली होती. तसेच एकमेकांविरूद्ध सुडाची भावना निर्माण झाली होती. त्यात आज यशच्या एका टपरीवर उभा असताना सूरज त्यांच्यासमोर आला होता.यावेळी पुन्हा त्यांच्यात वाद सूरू झाले होते. या वादादरम्यानच सुरजने खिशातून चाकू काढून यशच्या छातीत खुपसला होता. यात रक्तबंबाळ होऊन यश खाली कोसळला होता. त्यानंतर यशच्या मित्रांनी त्याला रुग्णालयात दाखल केले,तर सुरज हा फरार झाला होता.शहरातील गजबजलेल्या माने कॉम्प्लेक्स भागात हा खून झाल्याने बीडमधील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
advertisement
खरं तर छातीत झालेले दोन वार आरपार गेल्याने यश ढाका रक्तबंबाळ झाला होता. जखमी अवस्थेत त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले होते.यश हा अभियांत्रिकीचे (इंजिनिअरिंगचे) शिक्षण घेत होता. काही दिवसांपूर्वी वाढदिवस साजरा करताना वाद झाल्याने हा प्रकार घडल्याचे प्राथमिक माहिती समोर येत आहे.
advertisement
दरम्यान या घटनेनंतर सूरजने घटनास्थळावरून पळ काढला होता.त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ तपासाची चक्रे फिवरली होती. यानंतर अर्ध्या तासातच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुरज आप्पासाहेब काटे (वय २१, रा. बीड) या आरोपीला बेड्या ठोकून शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन केले होते. यानंतर आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
Location :
Bid,Maharashtra
First Published :
September 28, 2025 6:46 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Beed Crime : टपरीवर गाठलं अन् मित्रानेच मित्राचा गेम केला, बीडमधील हत्येचा LIVE VIDEO