मुंबई पोलिस आयुक्तालयासमोरील रुपम शोरूम क्रॉफर्ड मार्केटच्या मॅनेजरने एका मराठी तरुणाला गुजराती किंवा हिंदीमध्ये बोलण्यास जबरदस्ती केली. मॅनेजरने मराठी तरुणाला सांगितले की तो मराठी बोलणार नाही असे सांगितले. यानंतर मराठी तरुणाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख संतोष शिंदे यांना याबाबत माहिती दिली.
या घटनेनंतर संबंधित मॅनेजरला शिवसेना स्टाईलने समज दिली आणि त्याला मराठी बोलायला लावले तसेच मराठी लोकांची माफी मागायला लावली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला.
advertisement
कल्याणमध्येही घडला होता प्रकार...
मागील काही महिन्यांत मुंबई आणि परिसरात मराठी-अमराठी वाद होण्याच्या घटना वाढल्या आहेत. कल्याणमध्ये मराठी तरुणाला परप्रांतीय रिक्षा चालकांनी मारहाण केली होती. डोंबिवलीमध्येही पूजा आणि हळदी कुंकू समारंभाला सोसायटीतील अमराठी लोकांनी विरोध केला होता.
कल्याण पश्चिमेमध्ये मागील वर्षी डिसेंबर महिन्यात मराठी-अमराठी वाद झाला होता. कल्याणमधील योगीधाम परिसरातील अजमेरा हाईट्स या उच्चभ्रू सोसायटीत अखिलेश शुक्ला यांनी मराठी माणसांचा अपमान करणारे शब्द वापरले होते. त्याशिवाय, एका अमराठी महिलेने ‘तुम्ही मराठी लोक भिकारडे आहात. चिकन मटन खावून घाण करणारे आहात,’ अशी शेरेबाजी केली होती. डोंबिवलीतही एका 82 वर्षांच्या मराठी व्यक्तीला हिंदीत बोलण्यास भाग पाडण्यात आले होते.
