TRENDING:

Ganesh Chaturthi 2025: कलेला नसतं धर्म-जातीचं बंधन! मुस्लिम कारागीर घडवतात बाप्पासाठी ढोल

Last Updated:

Ganesh Chaturthi 2025: आपल्या देशामध्ये अनेक जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. अनेकदा ते आपल्या व्यवसायांच्या माध्यमातून एकमेकांच्या सणांची शोभा देखील वाढवतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगर: येत्या 27 ऑगस्ट रोजी सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. त्यासाठी सध्या गणेश भक्तांची जोरदार तयारी सुरू आहे. यंदाचा गणेशोत्सव दणक्यात कसा साजरा करता येईल, यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील आहे. ढोल-ताशांचा नाद हा गणेशोत्सवाचा आत्मा मानला जातो. बाप्पाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत संपूर्ण वातावरण दणाणून टाकणाऱ्या या ढोलांच्या निर्मितीला फक्त हिंदूंचाच नव्हे तर मुस्लिम बांधवांचाही हातभार असतो. छत्रपती संभाजीनगर शहरातील अनेक मुस्लिम कारागीर कित्येक वर्षांपासून भक्तिभावाने बाप्पासाठी ढोल तयार करतात.
advertisement

छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये अनेक मुस्लिम कारागीर ढोल तयार करण्याचं काम करतात. शेख रफिक हे त्यापैकीच एक आहेत. शेख कुटुंबातील अनेक पिढ्या हाच व्यवसाय करत आल्या आहेत. रफिक पाचव्या पिढीतील कारागीर आहेत. रफिक ढोल आणि पक्खवात ढोलकी देखील बनवतात. गणपतीमध्ये त्यांच्या ढोलांना संपूर्ण मराठवाड्यातून मोठी मागणी असते.

Bail Pola 2025 : सर्जा-राजाच्या जोडीचा साज बनणारे शेख कुटुंबीय, 3 पिढ्यांपासून करतात व्यवसाय

advertisement

शेख रफिक यांच्या पूर्वजांनी ढोल बनवण्याचा व्यवसाय सुरू केला होता. आता त्यांची सहावी पिढी देखील हेच काम शिकत आहे. त्यांच्याकडे सगळ्या प्रकारचे ढोले विक्रीसाठी असतात. ढोलांची किंमत सहाशे रुपयांपासून ते दोन हजारपर्यंत आहे. त्यासोबतच त्यांच्याकडे ढोलाचा जोडीदार असलेला ताशा देखील मिळतो. यावर्षी ताशाच्या किमतीत दहा ते पंधरा टक्क्याने वाढ झाली आहे.

advertisement

शेख रफिक म्हणाले, "ढोलासाठी लागणारं कच्च मटेरियल आम्ही स्वतः तयार करतो. ताशासाठी लागणारा पत्रा मात्र, दिल्लीहून मागवला जातो. विशेष करून गणपतीमध्ये ढोल ताशाला खूप मागणी असते. दरवर्षी अनेक मंडळं आमच्याकडूनच ढोल घेऊन जातात. गणपतीसाठी आम्हाला ढोल करायला खूप आवडतं. त्यातून एक वेगळाच आनंद मिळतो."

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ganesh Chaturthi 2025: कलेला नसतं धर्म-जातीचं बंधन! मुस्लिम कारागीर घडवतात बाप्पासाठी ढोल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल