advertisement

रायगडमध्ये शिवसेनेला मोठा धक्का, कोलांटउडी मारणं अंगलट, ते ७ नगरसेवक अपात्र!

Last Updated:

काही महिन्यांपूर्वी म्हसळा नगरपंचायतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे सात नगरसेवक पक्षांतर करून शिंदे गटात दाखल झाले होते.

म्हसळा नगर पंचायत
म्हसळा नगर पंचायत
मोहन जाधव, प्रतिनिधी, रायगड : म्हसळा नगरपंचायतीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमधून एकनाथ शिंदे यांच्या सेनेत प्रवेश केलेल्या सात नगरसेवकांना अपात्र करण्यात येत असल्याची माहिती रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
म्हसळा नगरपंचायतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागले होते. तब्बल सात नगरसेवकांनी शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश केला होता. त्यामुळे म्हसळा नगरपंचायतीत राजकीय भूकंप झालेला होता.
काही महिन्यांपूर्वी म्हसळा नगरपंचायतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे सात नगरसेवक पक्षांतर करून शिंदे गटात दाखल झाले होते. या घटनेमुळे म्हसळ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्चस्वाला धक्का बसला होता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या पक्षांतराविरोधात कायदेशीर मार्ग अवलंबत गटनेते संजय कर्णिक यांच्या माध्यमातून रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे अपात्रतेचा अर्ज दाखल केला होता. या प्रकरणाची सविस्तर सुनावणी झाल्यानंतर जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी या सातही नगरसेवकांचे सदस्यत्व आज रद्द केले आहेत. पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाल्याने हा निर्णय देण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
advertisement

कोण आहेत अपात्र ठरलेले नगरसेवक?

1) नगराध्यक्षा फरहिन अ. अजीज बशरत
2) नगरसेविका कमल रवींद्र जाधव
3) मेहजबिन नदीम दळवी
4) नगरसेवक असहल असलम कादिरी
5) नगरसेविका सुमैया कासम आमदानी
6) सारा अ. कादीर म्हसलाई
7) नगरसेवक शाहिद सईद जंजिरकर
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
रायगडमध्ये शिवसेनेला मोठा धक्का, कोलांटउडी मारणं अंगलट, ते ७ नगरसेवक अपात्र!
Next Article
advertisement
Gold Price : ऐन लग्नसराईत खिशावरचा भार वाढला, सोन्यानं बजेट बिघडवलं, दर ऐकाल तर डोळे होतील पांढरे
ऐन लग्नसराईत खिशावरचा भार वाढला, सोन्यानं बजेट बिघडवलं, दर ऐकाल तर डोळे होतील पा
  • लग्नासाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत

  • जागतिक बाजारातील घडामोडी आणि लग्नसराईमुळे वाढलेली मागणी यामुळे सोन्याच्या दराने

  • सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढल्याने ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

View All
advertisement