advertisement

Ranji Trophy : बापरे! सरफराज खानसह मुंबईच्या अनेक खेळाडूंची मैदानात मास्क घालून फिल्डींग, LIVE सामन्यात नेमकं काय घडलं?

Last Updated:

बीकेसीच्या मैदानावर सरफराज खान त्याचा लहान भाऊ मुशीर खान आणि इतर खेळाडू मास्क घालून मैदानात उतरले होते. त्यामुळे या खेळाडूंना पाहून अनेकांचा आश्चर्य वाटलं होतं.

ranji trophy 2025-26 match
ranji trophy 2025-26 match
Ranji Trophy News : रणजी ट्रॉफी 2025-26 च्या दुसऱ्या टप्प्याला सूरूवात झाली आहे.या टप्प्यात अनेक संघाचे विविध राज्यात सामने सूरू असताना इकडे मुंबईत मात्र बीकेसीच्या मैदानावर सरफराज खान त्याचा लहान भाऊ मुशीर खान आणि इतर खेळाडू मास्क घालून मैदानात उतरले होते. त्यामुळे या खेळाडूंना पाहून अनेकांचा आश्चर्य वाटलं होतं. दरम्यान नेमकं असं काय झालं, जेणेकरून हे खेळाडू मास्क घालून मैदानात उतरले? हे जाणून घेऊयात.
मुंबईच्या बीकेसी येथील शरद पवार क्रिकेट अकादमीमध्ये आज दिल्ली विरूद्ध मुंबई यांच्यातला पहिल्या दिवसाचा सामना पार पडला.या सामन्यात दिल्लीविरूद्ध फिल्डींग करताना मुंबईचे अनेक खेळाडूंना मास्क घालून मैदानात उतरले होते. मैदानाभोवती बांधकामाचे कामकाज सूरू आहे. त्यामुळे वातावरणात आणि मैदानात धु्ळीचे प्रमाण वाढले आहे.त्यामुळे हा धुळीचा त्रास टाळण्यासाठी सरफराज खान, मुशीर खान आणि हिमांशू सिंग यांनी मास्क घालून मैदानात प्रवेश केला होता.
advertisement
दरम्यान, दिल्लीला फलंदाजी करताना बऱ्यापैकी अडचण आली. सलामीवीर सनत सांगवानने चमकदार शतक झळकावून पाया रचला पण त्याला इतर फलंदाजांकडून फारसा पाठिंबा मिळाला नाही. टी२० विश्वचषक सराव सामन्यांच्या तयारीसाठी प्रियांश आर्य आणि आयुष बदोनी इंडिया अ संघात सामील झाल्यामुळे, दिल्लीची फलंदाजी कागदावर कमकुवत वाटत होती. प्रत्यक्षात, त्यांना धावफलक टिकवून ठेवण्यात अपयश आले, कारण पाहुण्या संघाचा पहिला डाव 221 धावांवर संपला.
advertisement
दरम्यान मोहित अवस्थीने मुंबईसाठी पाच विकेट घेतल्या.तुषार देशपांडे आणि शम्स मुलानी यांनीही प्रभावी कामगिरी केली आणि त्यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. पहिल्या दिवसाअखेर मुंबई 208 धावांनी पिछाडीवर होती.
मुंबईचीही पहिल्या डावात फलंदाजी चांगली झाली नाही. सलामीवीर आकाश आनंद 4 धावा करून बाद झाला आणि यजमान संघाचा दिवस १३/१ असा संपला. देशपांडेला नाईट वॉचमन म्हणून पाठवण्यात आले, जो तीन चेंडूंत टिकून राहिला. मुंबई पहिल्या दिवसाअखेर 208 धावांनी पिछाडीवर होती. आता दुसऱ्या दिवशी मुंबई कशी फलंदाजी करते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे,
advertisement
मुंबईची प्लेइंग इलेव्हन : अखिल हेरवाडकर, आकाश आनंद (विकेटकीपर), मुशीर खान, सिद्धेश लाड (क), सरफराज खान, हिमांशू सिंग, सुवेद पारकर, शम्स मुलाणी, ओंकार तुकाराम तरमाळे, तुषार देशपांडे, मोहित अवस्थी
दिल्ली प्लेइंग इलेव्हन : सनत सांगवान, ध्रुव कौशिक, वैभव कंदपाल, राहुल चौधरी, आयुष डोसेजा (क), सुमित माथूर, प्रणव राजवंशी (विकेटकीपर), राहुल डागर, आर्यन राणा, दिविज मेहरा, मनी ग्रेवाल
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Ranji Trophy : बापरे! सरफराज खानसह मुंबईच्या अनेक खेळाडूंची मैदानात मास्क घालून फिल्डींग, LIVE सामन्यात नेमकं काय घडलं?
Next Article
advertisement
Gold Price : ऐन लग्नसराईत खिशावरचा भार वाढला, सोन्यानं बजेट बिघडवलं, दर ऐकाल तर डोळे होतील पांढरे
ऐन लग्नसराईत खिशावरचा भार वाढला, सोन्यानं बजेट बिघडवलं, दर ऐकाल तर डोळे होतील पा
  • लग्नासाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत

  • जागतिक बाजारातील घडामोडी आणि लग्नसराईमुळे वाढलेली मागणी यामुळे सोन्याच्या दराने

  • सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढल्याने ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

View All
advertisement