नागपूर, 27 ऑगस्ट : आपल्या खुमासदार भाषणासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रसिद्ध आहेत. ते आपल्या भाषणात नेहमीच वेगवेगळे किस्से सांगत असतात. अनेकदा बोलताना गडकरी आपल्याच कार्यकर्त्यांना कानपिचक्या देत असतात. त्यांच्या असे किस्से नंतर सोशल मीडियावरही व्हायरल झालेले पाहायला मिळाले आहेत. असाच एक चिठ्ठीचा किस्सा गडकरी यांनी एका कार्यक्रमात बोलताना सांगितला.
advertisement
आमच्यासारखे नेत्यांच्या चिठ्ठ्यांवर जर कर्ज दिले तर बँक डुबत जाईल. एका जणाने तर मला चक्क अमेरिकेच्या अध्यक्षांच्या नावाने चिठ्ठी द्या असे म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गमतीदार किस्सा सांगितला. ते कामठी येथे अरविंद को-ऑपरेटिव्ह बँकेच्या नवीन शाखेच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते. यावेळी मंचावर चंद्रशेखर बावनकुळे तसेच आशिष देशमुख उपस्थित होते.
काय म्हणाले नितीन गडकरी?
आमच्यासारखे नेते चिठ्ठ्या वाटण्याचा काम करतात. काल माझ्याजवळ एक जण आला म्हणाला व्हिसा मिळत नसल्याने अमिरीकेच्या अध्यक्षांना चिठ्ठी द्या म्हणत होता. आम्ही चिठ्ठ्या देण्याचा धंदा करतो. मात्र, त्याचे परिणाम काय होतात. नेत्यांच्या चिठ्ठीवर लोन द्यायचे नाही तो काँग्रेसचा असो की भाजपचा. जोपर्यंत हे करत राहिल तोपर्यंत बँकेची प्रगती होत राहील. पण चेतन नेत्यांच्या चिठ्ठीचा आदर करत राहिले तर दहा पैकी आठ लोन हे डुबत जाईल आणि बँक डुबून जाईल, असा सल्ला गडकरी यांनी दिला.
वाचा - 'सरकार आपल्या दारी, थापा मारते लय भारी; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, म्हणाले..
सध्या जे सुरू आहे ते फक्त सत्ताकारण : नितीन गडकरी
समाजकारण, राष्ट्रकारण , विकासकारण आणि सेवाकारण यांचा मिलाफ हे खरे राजकारण. मात्र सध्या जे सुरू आहे, ते फक्त सत्ताकारण आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेच्यावतीने आयोजित एकल विद्यालयाच्या प्रशिक्षण वर्गाची माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत गडकरी बोलत होते. ते म्हणाले, सर्व खासदार, आमदार, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांनी राजकारणाकडे सेवा म्हणून पाहावे. समाजकारण, राष्ट्रकारण विकासकारण, सेवाकारण हेच आज खरे राजकारण आहे आणि सध्या जे सुरू आहे ते फक्त सत्ताकारण आहे.
