Uddhav Thackeray : 'सरकार आपल्या दारी, थापा मारते लय भारी; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, म्हणाले..
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Uddhav Thackeray : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांची आज हिंगोलीमध्ये सभा पार पडली. यावेळी ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
उदय तिमांडे, प्रतिनिधी
हिंगोली, 27 ऑगस्ट : हिंगोली येथील आपल्या निर्धार सभेतून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. मी गद्दारावर वेळ घालणार नाही. मी तुमच्याशी बोलायला आलो आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदेवर हल्लाबोल केला. यावेळी ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
advertisement
उद्धव ठाकरे यांच्या भाषणतील महत्त्वाचे मुद्दे
बऱ्याच दिवसानंतर तुमच्या दर्शनाला आलो. शांततेत आले आहेत. शांततेत जा. पाऊस आला तर बाजूला थांबा. कुठलीही यात्रा न काढता शंभू महादेव पावसाची कृपा करतोय. सरकार कसंही असो बळीराजा माझा आहे. त्याच्यावर अवकृपा करू नको महाराष्ट्र सुजलाम सुफलाम ठेवण्याचा आशीर्वाद ठेव. मंडपाच्या सभेची आपल्याला सवय नाही. काही लोकांना अपेक्षा असेल मी गद्दार वर बोलले पण मी त्यांच्यावर वेळ वाया घालवणार नाही. त्यांचा समाचार तुम्ही घ्याल. हिंगोली नेहमी शिव सेनेच्या मागे उभे राहिले आहे. काही गद्दार मेंडकुले दाखवत आहे. नाग पंचमीमध्ये या गद्दार नागांची पूजा केली पण पालटून डसायला लागले.
advertisement
शेतकरी लोकांना नाग पायाखाली आला तर काय करायचं हे माहिती आहे. गद्दार करणारे हिंदुत्ववादी राहू शकतात का? काही लोक इतर राज्यातून येत आहे, त्यांची भाषा समजत नाही. अब की बार किसान सरकार. शेतकरी माझ्या समोर आहे. गद्दारी झाली नसती तर मी तुमचं भल केलं असतं. हा पक्ष भाजपची सुपारी फोडायला आला आहे का?
advertisement
सरकार आपल्या दारी थापा मारी लय भारी. दुष्काळाच्या उंबरठ्यावर आपण आहे. अतिवृष्टीची नुकसान भरपाई अजून मिळाली नाही. गद्दारांची सुलतानी चिरडून टाकलं पाहिजे. ग्राहकांना कांदा परवडणाऱ्या भावात देण्याचं काम सरकारने करायला हवं. आपल्याकडील निवृत्त सरकारी अधिकाऱ्याने एक सर्व्ह केला कर्तव्य दक्ष अधिकारी त्याने मराठवाडामध्ये शेतकऱ्यांचा सर्व्ह केला त्यात 1 लाख च्या वर शेतकरी निराशेच्या गर्तेत असल्याचं समोर आले. त्यांचा निष्कर्ष सरकार पुढे मांडला. शेतकऱ्यांना पेरणी पूर्वी 25 हजार रुपये देण्याची मागणी केली. सरकारने त्याची मागणी मान्य न करता त्याला निवृत्ती घ्यावी लागली.
advertisement
सरकार आपल्या दारी आणि योजना कागदावरी. आमचं हिंदुत्व हृदयात राम आणि हाताला काम आहे. भाजपमध्ये सगळे आया राम आहेत. मला भाजप कार्यकर्त्यांची दया येते अनेक कार्यकर्ता यांनी सगळ सोडून पक्ष मोठा केला आज ते दांड्यापूर्ते मर्यादित आहे. मी भाजप सोबत युती तोडली तरी मला भाजप कार्यकर्त्यांच्या विषयी दया येते. उपरे आणून मी तुमच्यावर बसविले तर चालेल का? डबल इंजिन सरकार मध्ये अजित पवार यांचा एक डबा लागला आणखी किती डबे लावणार मालगाडी आहे. नेते बाहेरचे लागतात आणि वडील माझे लागतात तुमच्या दिल्लीतील वडिलांमध्ये मत मागण्याची हिंमत राहिली नाही याला नामर्द म्हणतात.
advertisement
मुंबई मध्ये इंडिया मध्ये देश भक्ताची सभा होणार आहे. आम्हाला पण भारत मता की जय म्हणण्याचा आधिकार आहे. आमच्या इंडियाला घमंडिया म्हणता आम्ही पण तुम्हाला घमेंडिया म्हणातो. एनडीए आता अमिबा झाला त्याला कुठला आकार शिल्लक नाही, ठिगळ लाऊन एनडीए तयार केला जातो. माझे विचार ऐकायला आलेले अतिरेकी आहे का? आमची तुलना इंडियन मुजाहिदीन सोबत करतात. इतरांवर आरोप करायचे आपल्या पक्षात आले की पावडर लाऊन साफ. आणि निरमा पावडर होता आता कुठली पावडर आहे.
advertisement
आपल्या दाडी वाल्याने पण पावडर लावली. आपल्या शास्त्रज्ञांचे आम्ही कौतुक करतो. मणिपूरमध्ये पंतप्रधान गेले नाही पण आफ्रिकेत गेले. तेथे इंडियन मुजाहद्दीनचा प्रतिनिधी म्हणून तिथे गेले की भारताचा प्रतिनिधी म्हणून गेले. मेहबूबा मुफ्ती सोबत मी बसलो करणं ते तुमच्या वॉशिंग पावडर मध्ये धुतले आहे. अतिरेक्यांना पाठिंबा पाकिस्तान देतो येणाऱ्या वर्ड कप मध्ये भारत पाकिस्तान सामना अहमदाबाद मध्ये होणार हे देशप्रेम आहे का?
मला अभिमान मी बाळासाहेब ठाकरे, मीनाताई ठाकरे यांचा मुलगा मला अभिमान माझ्या सोबत माझा मुलगा बसला माझी घराणे शही मान्य आहे की नाही हे जनता ठरवणार उपरे ठरवणार नाही. तुम्हाला घराणेशाही म्हणण्याचा अधिकार नाही कारण तुम्ही माझा बाप चोरला, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
Location :
Hingoli,Maharashtra
First Published :
August 27, 2023 4:06 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/हिंगोली/
Uddhav Thackeray : 'सरकार आपल्या दारी, थापा मारते लय भारी; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, म्हणाले..