राजकारणाच्या रिंगणातून थेट बिग बॉसच्या आखाड्यात! BBM6 मध्ये दीपाली सय्यदची ग्लॅमरस एन्ट्री, आल्या आल्या केला मोठा गेम

Last Updated:

Dipali Sayyad in Bigg Boss 6: आपल्या नृत्याने तरुणाईला वेड लावणाऱ्या दीपाली आता बिग बॉसच्या घरात कोणता नवा धमाका करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

News18
News18
मुंबई: ज्या नावाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर रंगली होती, त्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झालंय! आज, ११ जानेवारी २०२६ रोजी रात्री ८ वाजता रितेश देशमुख यांच्या 'बिग बॉस मराठी ६' चा पडदा उघडला आहे. या पर्वातील सर्वात 'फायर' ब्रँड स्पर्धक म्हणून अभिनेत्री आणि राजकारणी दीपाली सय्यद यांनी घरात पाऊल टाकलं आहे. आपल्या नृत्याने तरुणाईला वेड लावणाऱ्या दीपाली आता बिग बॉसच्या घरात कोणता नवा धमाका करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

नृत्यांगना ते आक्रमक नेत्या: दीपाली यांचा प्रवास

दीपाली सय्यद म्हणजे एक असं व्यक्तिमत्व, ज्यांच्या शब्दांत धार आणि डान्समध्ये आग आहे. १ एप्रिल १९७८ रोजी बिहारमध्ये जन्मलेल्या दीपाली यांनी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं असलं, तरी त्यांचं मन मात्र कलेत रमलं. नालंदा विद्यापीठातून 'फाईन आर्ट्स'ची पदवी घेणाऱ्या दीपाली यांनी १९९० च्या दशकात 'बंदिनी' आणि 'समांतर' या मालिकांतून अभिनयाचा श्रीगणेशा केला. मात्र, खऱ्या अर्थाने त्या गाजल्या त्या त्यांच्या ठसकेबाज लावणी आणि डान्स नंबर्समुळे.
advertisement
advertisement

राजकीय आखाड्यातून 'बिग बॉस'च्या कैदेत

दीपाली केवळ अभिनयापुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत. त्यांनी समाजकारण आणि राजकारणातही नशिब आजमावलं. २०१४ मध्ये अहमदनगरमधून 'आप'च्या तिकिटावर, तर २०१९ मध्ये मुंब्रा-कळवा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर त्यांनी निवडणूक लढवली. निवडणुकांच्या मैदानात त्यांना यश मिळालं नसलं, तरी त्यांची 'रोखठोक' विधानं नेहमीच चर्चेचा विषय ठरली. आता त्याच 'आक्रमक' बाण्याची प्रचिती बिग बॉसच्या घरात येणार आहे.
advertisement

घरात 'राडा' होणार हे नक्की!

बिग बॉसचं घर म्हणजे संयमाची परीक्षा. दीपाली सय्यद या त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जातात. समोर कोणीही असो, अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यात त्या मागे-पुढे पाहत नाहीत. अशातच, रितेश देशमुख यांनी दिपालीला शॉर्टकट दार किंवा मेहनत दार यापैकी एकाची निवड करायला सांगितली. यानंतर दिपालीने शॉर्टकट दाराची निवड करत घरात प्रवेश केला आहे. आता घरातील इतर स्पर्धकांशी त्यांची जुगलबंदी कशी रंगते, हे पाहणं रंजक ठरेल. सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांनी आधीच 'राडा होणार' अशा कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
advertisement
advertisement

नव्या घरात नवी खेळी

यंदाचं घर ८०० खिडक्या आणि ९०० दारांनी सजलं असून, रितेश देशमुख यांच्या 'भाऊचा धक्का' यंदा कोणाला बसणार? यात दीपाली आपली जागा कशी बनवतात, हे महत्त्वाचं ठरेल. एका बाजूला त्यांचा ग्लॅमरस अंदाज आणि दुसऱ्या बाजूला त्यांचा राजकीय अनुभव, हे समीकरण त्यांना विजयापर्यंत नेणार का?
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
राजकारणाच्या रिंगणातून थेट बिग बॉसच्या आखाड्यात! BBM6 मध्ये दीपाली सय्यदची ग्लॅमरस एन्ट्री, आल्या आल्या केला मोठा गेम
Next Article
advertisement
Silver Price Prediction: गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्टने काय म्हटलं?
गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्ट
  • मागील वर्षात चांदीने गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न दिले.

  • चांदीच्या दरात मागील काही दिवसापूर्वी चांगलीच उसळण दिसून आली होती.

  • त्यानंतर गुंतवणूकदारांकडून गुंतवणुकीसाठी चांदीच्या पर्यायाकडे प्राधान्य दिले जात

View All
advertisement