राज ठाकरेंनी मुंबईच्या सभेत मागितली माफी, पहिल्यांदाच भावविवश; अख्खं शिवाजी पार्क स्तब्ध
- Published by:Prachi Amale
Last Updated:
मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेसाठी शिवाजी पार्कात तब्बल 20 वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र आले असून राज ठाकरेंनी जाहीर माफी मागितली. नेमकं काय घडलं? हे जाणून घेऊया
मुंबई : बाळासाहेबांसोबत अनेकदा या मैदानावर आलो. शीवतीर्थावरच शिवसेनेची स्थापना झाली. आज प्रबोधनकार, बाळासाहेब आणि आई-वडील इथे असायला हवे होते, असे सांगत राज ठाकरे भावूक झाले. मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेसाठी शिवाजी पार्कात तब्बल 20 वर्षांनी ठाकरे बंधू म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्त सभा पार पडली. या दोन्ही भावांच्या या पहिल्या संयुक्त सभेत राज ठाकरे पहिल्यांदाच भावविवश झाल्याचे पाहायला मिळाले.
बाळासाहेबांबरोबर या व्यासपीठावर अनेकदा आलो होतो. तेव्हा सगळे इथेच होते, असे सांगत त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. आज दोन भाऊ मुंबईवर आलेल्या संकटामुळे एकत्र आले. वडील श्रीकांत ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, आई – सगळे वरून पाहत असतील. मराठी माणूस आणि मुंबईसाठी आम्ही उभारलेला लढा ते पाहत असतील, असे भावनिक उद्गार त्यांनी काढले.
advertisement
राज ठाकरेंनी भर सभेत मागितली माफी
राज ठाकरे यांनी सांगितले की, 20 वर्षांनंतर आम्ही पहिल्यांदा युती करत आहे. मात्र या युती प्रक्रियेत अनेकांना तिकीट देता आले नाही, काही नाराज झाले, काहींनी दुसरी वाट धरली, याची कबुली देत त्यांनी माफीही मागितली. कोणाला दुखवायचं मनात नव्हतं. गेलेले परत येतीलच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
advertisement
राज ठाकरेंनी युती का केली?
युतीमागील मुख्य कारण स्पष्ट करताना त्यांनी सांगितले, मुंबईवर जे संकट आलं आहे, तेच आम्ही एकत्र येण्याचं सर्वात मोठं कारण आहे. हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर सरकारवर टीका करताना ते म्हणाले, हा विषय आला तेव्हा आम्ही कडाडलो. कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, असं मी आधीच सांगितलं होतं. हिंदी सक्ती हा तुम्हाला चाचपडून पाहण्याचा प्रयोग होता. या सरकारला फेफर आलंय. जे हवंय ते करायला लागले. आली कुठून ही हिंमत? पैसे फेकले की विकत घेऊ, असा विश्वास कुठून आला?” अनेक सरकारे आली-गेली, पण असं वागणारं सरकार कधी पाहिलं नाही, असा आरोपही त्यांनी केला.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 11, 2026 8:53 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
राज ठाकरेंनी मुंबईच्या सभेत मागितली माफी, पहिल्यांदाच भावविवश; अख्खं शिवाजी पार्क स्तब्ध









