नागपूर: डोनेशनच्या जमान्यात '1 रुपयात कॉन्व्हेंट' हे नाव ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे खरे आहे. नागपूर शहरातील असलेल्या रामटेकेनगर टोळी येथे 1 रुपयात कॉन्व्हेंट सुरू करण्यात आले असून, या कॉन्व्हेंटमध्ये गरीब कुटुंबातील मुलांना शिक्षण दिलं जातं आहे. या शाळेत भीक मागणाऱ्या आणि कचरा वेचायला जाणार्या महिलांच्या मुलांना शिक्षणाचे धडे दिले जातात. युवा समाजसेवक कुशाल डाक हे कॉन्व्हेंट चालवत आहेत. भीक मागणाऱ्या आणि कचरा वेचायला जाणार्या महिलांच्या कमकुवत आर्थिक परिस्थितीमुळे त्यांची मुले चांगल्या शाळेचा विचारही करू शकत नाहीत. मात्र मुलांना नि:स्वार्थपणे शिकवणाऱ्या खुशाल यांनी मुलांनी शिक्षण घेऊन चांगली नोकरी करावी यासाठी हे काॅन्व्हेंट सुरू केलं आहे.
advertisement
शालेय साहित्य दिलं जातं मोफत
चांगले शालेय शिक्षण घेणं हे गरीब मुलांना शक्य होत नाही. त्यामुळे खुशाल डाक सेवा सर्वदा बहुउद्देशीय संस्थेअंतर्गत शिक्षण देत आहेत. यामध्ये कचारा गोळा करणार्या आणि भीक मागणाऱ्या महिलांच्या मुलांना प्री-नर्सरी ते इयत्ता पहिलीपर्यंतचे शिक्षण दिलं जातं आहे. या बरोबर मुलांच्या कुटुंबावर आर्थिक बोजा पडू नये, यासाठी शालेय गणवेशापासून ते शालेय साहित्यापर्यंत मुलांना मोफत दिलं जातं आहे. सणासुदीला दात्यांमार्फत मुलांना भेटवस्तू आणि खाद्यपदार्थ दिले जातात, त्यामुळे मुले आनंदाने मोठ्या संख्येने शाळेत येत आहेत.
भटक्या कुत्र्यांसाठी नागपुरातील स्मिता बनल्या आई, 250 हून अधिक कुत्र्यांना मिळवून दिलं हक्काचं घर
या मुलांच्या पालकांचा आपल्या मुलांना शिक्षण देण्याचा कोणताही हेतू नाही, कारण त्यांना वाटते की आपल्या मुलांना शिक्षण मिळाले तर आपल्या घरातील चूल पेटविणे कठीण होईल. त्यामुळेच मुलांच्या शिक्षणाला त्यांचा नेहमीच विरोध असतो. मात्र मी मुलांच्या पालकांची समजूत काढली आहे. या मुलांना पैसे देऊन आपण शिक्षण घेत आहोत, असे वाटावे यासाठी 1 रुपया फिस ठेवण्यात आली आहे, असं कुशाल डाक यांनी सांगितले आहे.
रद्दीत जाणाऱ्या वह्यांच्या पानांचा असाही पुनर्वापर, शिक्षकाने तयार केले घरीच नोटपॅड
अनेक वेळा कॉन्व्हेंटची बदलावी लागली जागा
मुलांना शिक्षण मिळाले तर त्यांना भीक मागायला लावता येणार नाही आणि त्यांच्या कमाईत बाधा येईल, असे त्यांना वाटते. त्यामुळे या मुलांच्या आई-वडिलांच्या उदासीन वृत्तीमुळे अनेक वेळा कॉन्व्हेंटची जागा बदली आहे, असेही कुशाल डाक यांनी सांगितले आहे.