पूर्णतः मेंटेनन्स फ्री घड्याळ
या घड्याळीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही घड्याळ पूर्णतः मेंटेनन्स फ्री आहे. आठवड्यातून दोन वेळा याला चावी द्यावी लागते. सध्याच्या काळातही या पोलीस मुख्यालयातील कामकाज याच घड्याळाच्या टिक टिकवर चालतं. या पोलीस मुख्यालयात असलेल्या पोलिसांसह अनेकांचे या घड्याळासोबत एक भावनिक नाते असून त्याचे वैभव आजदेखील कायम आहे.
advertisement
कधीच बंद पडले नाही घड्याळ
या घड्याळी विषयी अधिक माहिती देताना येथे कार्यरत असलेले राखीव पोलीस उपनिरीक्षक विनोद तिवारी असे म्हणाले कि, माझा जन्म आणि बालपण याच मुख्यालयाच्या परिसरात असलेल्या पोलीस टाकळी येथे गेले. तेव्हापासून मी हे घड्याळ मी बघतो आहे. आज तागायत हे घड्याळ कधी बंद पडलं किंवा कधी चुकीचा टाईम सांगितला किंवा त्यात काही बिघाड झाल्याचे माझ्या तरी पाहणीत नाही. पोलिस मुख्यालयाची वास्तू ही ब्रिटीशकालीन आहे. या इमारतीच्या निर्मितीच्या वेळीच या घड्याळाची निर्मिती केली गेली. तसे वर्ष देखील या इमारत आणि घडीवर नोंद आहे. विशेष बाब म्हणजे याचा मेंटेनन्स म्हणून काहीही नाही. फक्त त्याचे ग्रीस आणि ऑईलिंग तेवढे केलं म्हणजे झाले.
शिकार, अपघात अन् मृत्यू; गेल्या 5 वर्षात 115 वाघांनी सोडला जीव, धक्कादायक आकडेवारी समोर
काय आहेत घड्याळाची वैशिष्ट्ये?
या घड्याळीची काही खास वैशिष्ट्ये आहेत. ते प्रत्येक अर्ध्या तासानंतर एक ठोका देते. तसेच या घडाळीत जितके वाजले त्याप्रमाणे ती तितके ठोके देते. उदाहरणार्थ समजा बारा वाजले असतील तर बारा ठोके दिले जातात. आजही पोलीस मुख्यालयातील कामकाज याच घड्याळाच्या टिकटिक वर सुरू आहे. येथे कार्यरत असलेल्या क्वार्टर गार्ड ही मुख्यालयाची ड्युटी देखील याच घड्याळाच्या आवाजावरून बदलत असतात. त्याच्या ठोक्यांचा आवाज एवढा मोठा असतो की परिसरातील सर्वांना तो ऐकू जातो. हे घड्याळ नागपूर पोलीस मुख्यालयासह शहराचे एक ऐतिहासिक वैभव असल्याचे मत विनोद तिवारी यांनी बोलताना व्यक्त केले.