आशियाई विक्रम प्रस्थापित
ज्याप्रमाणे पर्वतारोहींना माउंट एवरेस्ट खुणावत असतो, त्याचप्रमाणे जलतरणपटूंना ही इंग्लिश खाडी खुणावत असते. जगभरात ज्या 7 खड्या आहेत त्यातील ही एक महत्त्वपूर्ण आणि कठीण खाडी मानली जाते. इंग्लंड ते फ्रान्स व परत फ्रान्स ते इंग्लंड असे तब्बल 70 किमीचे अंतर आम्ही 31 तास 29 मिनिटांमध्ये पूर्ण केले आहे. ही इंग्लिश खाडी टू वे रिले टीम मध्ये पार करणारी आणची टीम ही आशियाई खंडातील पहिली टीम ठरली आहे. हा नवा आशियाई विक्रम देखील प्रस्थापित झाला आहे, असे जयंतने सांगितले.
advertisement
अशी होती आव्हाने
या प्रवासात शारीरिक, मानसिक आव्हान होतंच. शिवाय निसर्गातील बदल त्यातील अनिश्चितता ही फार मोठी अडचण होती. समुद्रातील पाणी हे बर्फाप्रमाणे थंड होते. सर्वसाधाणपणे बारा ते पंधरा अंश सेल्सिअस डिग्रीच्या थंड पाण्यात पोहणे त्यासोबतच अतिशय वेगाने वाहणारे थंड वारे, उसळणाऱ्या लाटा आणि मध्येच धुक्यात हरवल्या सारखे वातावरण झाल्याने माझ्या टीमची आणि माझी चुकामूक होत होती. तसेच अनेक जलचर प्राण्यांचा अडथळा हा जलतरणपटूंना पार करावा लागतो. त्यात जेलीफिशचा किंवा नाटोरीयन सी लॉयन सारखे जलचर प्राणी हे सारे माझ्यासाठी अतिशय आव्हानात्मक होते. त्याला मी यशस्वीपणे शह देऊ शकलो. सगळी आव्हाने पार करून हा विक्रम करू शकलो, याचा मला आनंद होत आहे, अशी भावना जयंत दुबळेने व्यक्त केली.
तुम्हाला व्हायचं डॉग ट्रेनर? इंजिनिअर तरुणाकडून जाणून घ्या श्वानांची संपूर्ण माहिती
अंबाझरी तलावात केला सराव
स्विमिंग टॅंक मध्ये पूर्ण आणि ओपन स्पेस किंवा समुद्रात पोहणे यात बराच फरक आहे. या प्रवसात माझे वडील डॉ. जयप्रकाश दुबळे हेच माझे प्रशिक्षक होते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी या मोहिमेची संपूर्ण आखणी केली. नागपूरमध्ये समुद्र नाही मात्र त्याची उणीव मी अंबाझरी तलावात सराव करून भरून काढली. रात्री 6-12 तास मी त्यात सराव केला. नंतर मुंबई येथील जुहू चौपाटीवर मला सराव करता आला, असं जयंतनं सांगितलं.
आईचे स्वप्न केलं पूर्ण
कोरोन काळात आईचे निधन झाले. या दुःखद प्रसंगी माझ्या कुटुंबासह मी खचून गेलो होतो. मात्र माझ्या आईचंच हे स्वप्न होतं. माझ्या 2 बहिणी, आजी आणि गुरू प्रमाणे असलेले माझे वडील यांनी मला हिंमत दिली. माझ्यात विश्वास भरला. अनेक थोरा मोठ्यांचे आशीर्वाद मार्गदर्शन या प्रवासात लाभले. त्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादाने मला हे यश प्राप्त झाले आहे. आज आईचे स्वप्न पूर्ण करू शकलो याचा सर्वाधिक आनंद आहे, असे मत जयंतने बोलताना व्यक्त केले.