आम्ही कुणाबद्दल बोलत आहोत याची कल्पना तुम्हाला आलीच असेल. हो.. बरोबर ओळखलंत... नारायण राणे आणि दीपक केसरकर. राणे - केसरकर यांच्यामधला वाद अवघ्या कोकणाला माहिती आहे. पण आता रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी काही नावं चर्चेत आल्यानंतर हे दोन्ही नेते एकाच गाडीतून प्रवास करताना दिसले.
advertisement
सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभेच्या जागेसाठी अनेक नाव चर्चेत आहेत. यात नारायण राणे, दीपक केसरकर, किरण सामंत यांचा समावेश आहे. त्यासोबत ही जागा शिंदे गटाला दिली जाईल अशा देखील चर्चा होत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं नाव या जागेसाठी चर्चेत आल्यानंतर प्रथमच नारायण राणे, दीपक केसरकर आणि नितेश राणे एकाच गाडीतून प्रवास करताना दिसून आले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी स्वतः गाडी थांबवत प्रसार माध्यमांना हे व्हिडिओ घेण्यास सांगितलं. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. आता गाडीत नेमक्या काय चर्चा रंगल्या असतील याबाबत तर्क वितर्क लढवण्यात येत आहेत.
कार्यकर्त्यांनी दिलेललं बर्थडे सरप्राईज, उदयनराजे भारावले; म्हणाले, 'मला जाऊ द्या ना घरी...'
दीपक केसरकर 2009 मध्ये पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आल्यानंतर राणे आणि केसरकर यांचं सख्ख्य नव्हतं. त्यामुळे नेहमी राणेंच्या विरोधात तोफ डागणाऱ्या दीपक केसरकरांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीआधी शिवसेनेत प्रवेश केला होता.त्याचाच फटका म्हणून नारायण राणेंना 2014 च्या विधानसभेत पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर दीपक केसरकरांनी सातत्यानं राणेंवर टीका केली होती.
