Balasaheb Thorat vs Radhakrishna Vikhe : वाळू धोरण अन् महसूल; आजी-माजी महसूल मंत्र्यांमध्ये पुन्हा राजकीय कलगीतुरा
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
महसूल मधील महसूल कमी झाल्याची टीका बाळासाहेब थोरात यांनी केली होती यावर विखेंनी जोरदार निशाणा साधलाय.
साहेबराव कोकणे, अहमदनगर : राज्याच्या राजकारणात विखे आणि थोरात एकमेकांचे राजकीय हाडवैरी मानले जातात. मविआ सरकारमध्ये थोरात यांच्याकडे महसूलमंत्रीपद होतं, त्यानंतर आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये हे खातं राधाकृष्ण विखे यांच्याकडे महसूल मंत्री पद देण्यात आले. महसूल मंत्रालयातील महसूल वरून विखे-थोरात यांच्यात पुन्हा राजकीय संघर्ष पेटला आहे. कारण महसूल मधील महसूल कमी झाल्याची टीका बाळासाहेब थोरात यांनी केली होती यावर विखेंनी जोरदार निशाणा साधलाय.
बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजकीय होईल सर्वश्रुत आहे. दोघेही राजकारणामध्ये कुरखोडी करण्याची एकही संधी सोडत नसतात. राधाकृष्ण विखे पाटील महसूल मंजूर झाल्यापासून त्यांनी वाळूचे धोरण राबवले. त्यामध्ये राज्याचा महसूल बुडलाचा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला होता. त्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाळूचा महसूल कमी झालेला नाही. मात्र या धोरणामुळे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यात वाळू तस्कर पोसले. ती आता होत नाही. त्यामुळे त्यांचा वैयक्तिक महसूल बुडाला असा थेट आरोप विखेंनी केला.
advertisement
राधाकृष्ण विखे पाटलानंतर गप्प बसतील ते बाळासाहेब थोरात कसले. त्यांनीही लगेच पलटवार केला. महसूल खात्याचा बारकाईने अभ्यास करण्याची गरज आहे. त्या खात्यामध्ये 22 ते 23 हजार कोटी रुपयांचं उत्पन्न हे गौण खनिज मधून येत असतं त्याबाबत मी बोललो होतो. त्यांना व्यक्तिगत माझ्यावर घसरण्याचं काही कारण नव्हतं मात्र मी काय भाषण केलेली आहेत ते त्यांच्या जिव्हारी लागलाच दिसतंय असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 24, 2024 10:58 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
Balasaheb Thorat vs Radhakrishna Vikhe : वाळू धोरण अन् महसूल; आजी-माजी महसूल मंत्र्यांमध्ये पुन्हा राजकीय कलगीतुरा