मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे आणि धोत्रे गट यांच्यात हा वाद झाला. या हाणामारीत धोत्रे गटाचा सदस्य असलेला राहुल आणि अजय धोत्रे जखमी झाले असून, त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी या घटनेमागे भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे असल्याचा आरोप केला आहे.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यात दोन गट एकमेकांवर जोरदार हल्ला करताना दिसत आहेत. ज्या प्रत्यक्षदर्शीने हा व्हिडीओ शूट केला, तो हा हल्ला पाहून घाबरलेला दिसत आहे. 'अरे हा मेला वाटतं' असंही हा तरुण बोलताना दिसत आहे. या व्हिडीओतून प्रत्यक्षदर्शीचं संभाषण पाहून ही मारहाणीची तिव्रता लक्षात येते. ठाकरे गटाने या प्रकरणातील मुख्य सूत्रधार उद्धव निमसे यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. राजकीय वैमनस्यातून घडलेली ही घटना आगामी काळात शहरात तणाव वाढवू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.
advertisement
या घटनेमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. या प्रकरणात नेमके काय कारण आहे आणि कोण कोण सहभागी आहे, याचा पोलीस शोध घेत आहेत. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.