नाशिक - नाशिक शहरातील पंचवटी परिसरात एमबीएचे विद्यार्थी झेंडूची फुले विकताना पाहायला मिळत आहे. पुस्तकी ज्ञानाबरोबर व्यावसायिक शिक्षणाचे धडेही विद्यार्थ्यांना मिळावेत यासाठी केबीटी महाविद्यालयाच्या वतीने हा उपक्रम राबवला जात आहे. यामध्ये एमबीएच्या प्रथम वर्षाचे विद्यार्थी आज दसऱ्याच्या निमित्ताने झेंडुची फुले विकत आहेत.
विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबर व्यावसायिक ज्ञानात भर पडावी यासाठी या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. केबीटी महाविद्यालयाकडून हा उपक्रम राबवला जात आहे. वर्गात बसून पुस्तकीय ज्ञान मिळते. परंतु ते ज्ञान अनुभवातून देखील मोठ्या प्रमाणात मिळते, असे यावेळी सांगण्यात आले.
advertisement
विद्यार्थ्यांनी हे सर्व शिक्षण घेत असताना ज्या ज्या गोष्टी ते शिकत आहे, त्याचे प्रत्यक्ष अनुभव घ्यावा यासाठी केबीटी या महाविद्यालयीने विद्यार्थ्यांना थेट अनुभवासाठी दसऱ्या निमित्त बाजारात आलेल्या झेंडूची फुले जाऊन योग्य दरात खरेदी खरेदीचा अनुभव घेतला. बाजारात कशा प्रकारे आणि कुठल्या प्रकारे ही फुले विक्री होत असतात आणि ती किती रुपयाला विक्री होत असते याचाही अनुभव विद्यार्थ्यांनी यावेळी घेतला.
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी!, आता 15 डब्यांच्या लोकल धावणार, नेमका काय बदल?
तसेच त्यानंतर विकत घेतलेल्या फुलांचे स्वत: आपल्या हाताने अनेक प्रकारच्या फुलांचे हार तयार केले. तसेच हार विक्री करण्याकरीता नाशिक पंचवटी भागात आपल्या वर्ग मित्र मैत्रिणीसोबत फुल भांडार थाटले आहे. आपण घेतलेले फुल हे किती रुपयाला आपल्याला मिळाले आणि आपण त्यातून कशा नफा मिळू शकतो, हा अनुभव आज प्रत्यक्ष या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी घेतला.
तसेच विक्री केलेल्या फुलांमधून झालेल्या फायद्याच्या रकमेतुन 10 टक्के रक्कम महाविध्यालायाला देण्यात येणार असून उरीत रक्कम ही आपल्यां मेहनतीची असून ती सांभाळून नवीन यातून काही उद्योग करणार असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी लोकल18 शी बोलताना दिली. या ठिकाणी 50 रुपये ते 100 रुपये प्रमाणे हे विद्यार्थी आपला फुलांचा माल विकताना दिसत आहे. दरम्यान, या अनोख्या उपक्रमामुळे महाविद्यालयाचे आणि शिक्षकांचे नाशिककरांच्या वतीने कौतुक करण्यात येत आहे.