मृत पती गोविंद शेवाळे याच्यावर गुन्हा दाखल
या प्रकरणात, मृत पती गोविंद शेवाळे याच्यावर पत्नी आणि मुलांच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोविंद शेवाळे हे गृहरक्षक दलात कर्मचारी होते. रविवारी सकाळी 6:51 वाजता त्यांनी हे विचित्र व्हॉट्सअॅप स्टेट्स ठेवले. त्यानंतर काही वेळातच गोविंद शेवाळे दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. त्यांची पत्नी कोमल (वय 35), मुलगी हर्षाली (वय 9) आणि मुलगा शिवम् (वय 2) हे तिघेही पलंगावर मृत अवस्थेत आढळले.
advertisement
सामुहिक आत्महत्या की हत्याकांड?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरातून कोणतीही आर्थिक किंवा कौटुंबिक वादाची तक्रार यापूर्वी कधीच आली नव्हती. असे कोणतेही कारण नसताना अचानक घडलेल्या या सामुहिक आत्महत्या आणि हत्याकांडामुळे परिसरातील लोक चकित झाले आहेत. घटनेमागील नेमकं कारण काय असावे, याचा तपास पोलीस सध्या करत आहेत. घरात चूक काय घडले असावे, ज्यामुळे गोविंद शेवाळे यांनी इतका मोठा निर्णय घेतला, याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. संपूर्ण तालुक्यात या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
घरात दोरी बांधून आत्महत्या
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार,पतीनं घरात दोरी बांधून आत्महत्या केल्याचा संशय आहे. मात्र याआधी त्याने पत्नी आणि मुलांची निर्घृण हत्या केल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जातेय. घरात जबरदस्ती किंवा घरफोडीचे कोणतेही चिन्ह नसल्याने हा प्रकार कौटुंबिक वादातून घडल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
