वाहतूककोंडीची समस्या उद्भवू नये आणि नागरिकांची बाजारपेठेत गैरसोय होऊ नये, यासाठी शहर वाहतूक शाखेच्या पोलिस उपायुक्त किरिथिका सी. एम. यांनी वाहतूक मार्गात बदलाची अधिसूचना जारी केली. अधिसूचनेचे पालन करणे वाहनचालकांना बंधनकारक आहे.
दिवाळीच्या मुहूर्तावर घ्या स्वामींचे दर्शन! बदलापूर ते अक्कलकोट एसटी बससेवा सुरु, किती आहे तिकीट दर?
या मार्गावर असणारा प्रवेश बंद
advertisement
मालेगाव स्टॅण्ड-रविवार कारंजापर्यंतचा रस्ता.
दिल्ली दरवाजा-धुमाळ पॉइंटकडे येणारा रस्ता.
रोकडोबा मैदान-साक्षी गणेश मंदिर भद्रकालीकडे येणारा रस्ता.
बादशाही कॉर्नर-गाडगे महाराज पुतळ्याकडे जाणारा रस्ता.
नेपाळी कॉर्नर-गाडगे महाराज पुतळामार्गे मेनरोडकडे जाणारा मुख्य रस्ता.
रेडक्रॉस सिग्नलकडून धुमाळ पॉइंटकडे जाणारा रस्ता.
रविवार कारंजा-धुमाळ पॉइंटकडे जाणारा रस्ता.
पुढील काही दिवस पर्यायी मार्ग असा...
मालेगाव स्टॅण्ड येथून वाहने मखमलाबाद नाका-रामवाडीमार्गे हनुमानवाडी लिंकरोडवरून पुढे जातील.
पंचवटीकडून येणारी वाहने संतोष टी पॉइंटवरून द्वारकामार्गे पुढे जातील.
सीबीएस, शालिमारकडून जुने नाशिकमध्ये जाणारी वाहने शालिमार-गंजमाळ दूधबाजार चौक रस्त्याचा वापर करतील.
वाहनचालकांनी गर्दीची ठिकाणे सोडून तसेच निर्बंध असलेल्या परिसर वगळून अन्य रस्त्यांचा स्वयंस्फूर्तीने वापर करावा.
या ठिकाणी असणार पार्किंग व्यवस्था
सागरमल मोदी विद्यालय, शालिमार (पे-पार्क), बी.डी. भालेकर मैदान शालिमार, स्मार्ट सिटीने आखून दिलेल्या जागा, गोदाकाठालगत तसेच गाडगे महाराज पुलाखाली पार्किंगची सोय करण्यात आली आहे.