दिवाळीच्या मुहूर्तावर घ्या स्वामींचे दर्शन! बदलापूर ते अक्कलकोट एसटी बससेवा सुरु, किती आहे तिकीट दर?
Last Updated:
Balapur To Akkalkot Bus Service : दिवाळीच्या सुट्टीत अक्कलकोटला जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बदलापूर ते अक्कलकोट दररोज बससेवा आजपासून सुरू झाली आहे. प्रवाशांना आरामदायक आणि सोयीस्कर प्रवास मिळेल.
बदलापूर : दिवाळीच्या सुट्टीत श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यासाठी अक्कलकोटला जाणाऱ्या बदलापूर आणि परिसरातील भाविकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. अनेक दिवसांच्या मागणीनंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अखेर बदलापूर ते अक्कलकोट थेट बससेवा सुरू केली आहे.
बदलापूर- अक्कलकोट दररोज बस सेवा सुरु
या सेवेला १० ऑक्टोबरपासून सुरुवात झाली असून यामुळे स्वामी भक्तांची मोठी गैरसोय दूर झाली आहे. आतापर्यंत बदलापूर येथून थेट अक्कलकोटला जाण्यासाठी कोणतीही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नव्हती. प्रवाशांना खासगी वाहनांवर किंवा मुंबई तसेच पुण्यात बस बदलण्यावर अवलंबून राहावे लागत होते. यात वेळ आणि पैसा दोन्ही अधिक लागत असे ज्यामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना प्रवासात खूप त्रास सहन करावा लागत होता. दिवाळीच्या काळात ही अडचण आणखीनच वाढायची.
advertisement
शहरातील स्वामी भक्तांची ही अडचण लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी या बससेवेसाठी अथक पाठपुरावा केला. आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही तत्कालीन परिवहन मंत्र्यांकडे याबाबत सातत्याने पत्रव्यवहार केला. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळून ही बहुप्रतीक्षित बससेवा अखेर सुरू झाली आहे.
शुक्रवारी परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांच्या हस्ते या बससेवेचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. ही बससेवा सध्या प्रायोगिक तत्त्वावर आठवड्यातून एकदा उपलब्ध असणार आहे.
advertisement
बदलापूर ते अक्कलकोट; तिकीट आता ऑनलाईन किंवा स्थानकावर
या सेवेमुळे दिवाळीच्या सुट्टीत स्वामी दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रवासाचा थेट मार्ग उपलब्ध झाल्यामुळे प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होणार आहे. तसेच तिकीट बुकिंगसाठी प्रवासी एसटी महामंडळाच्या वेबसाईटसह, रेड बस ॲप आणि बदलापूर एसटी स्थानकावरही सोय उपलब्ध आहे.
बदलापूर- अक्कलकोट बसचे तिकीट दर जाणून घ्या
view commentsबदलापूर- अक्कलकोट बससाठी तिकीटाची किंमत 805 रुपये आहे. महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्धा तिकीट (403 रुपये) उपलब्ध आहे, तर 75 वर्षांवरील वृद्ध नागरिकांना प्रवास पूर्णपणे मोफत करण्यात आला आहे, ज्यामुळे सर्व प्रवाशांसाठी सोय झाली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 15, 2025 9:37 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
दिवाळीच्या मुहूर्तावर घ्या स्वामींचे दर्शन! बदलापूर ते अक्कलकोट एसटी बससेवा सुरु, किती आहे तिकीट दर?