पतीने पत्नीला थेट पत्राद्वारे दिला तिहेरी तलाक
पोलिसांच्या माहितीनुसार पत्र कुरिअरद्वारे पाठवण्यात आले असून त्यामध्ये पतीने स्वतःच्या हस्ताक्षरात तिहेरी तलाक दिल्याचा दावा केला होता. ज्यात “मैं पूरे होशो हवास के साथ तुम्हें तलाक देता हूँ” असे लिहून पाठविले शिवाय ज्या वेळेस हे पत्र तिला मिळाले तेव्हा तिच्या पतीने कॉल करुन तीन वेळा तलाक म्हटलं आहे. या प्रकरणी संशयित पतीसोबतच सासरे आणि सासू यांच्याविरुद्धही गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
advertisement
नेमंक कारण काय?
पीडितेचा आरोपी पतीसोहत जानेवारी 2022 मध्ये निकाह झाला होता आणि सुरुवातीला सर्व काही सुरळीत सुरु होते. नंतर व्यवसायासाठी पैसे हवे असल्याने पतीने सासरच्यांकडून पैसे मागितले. त्यातून दोघांमध्ये वाद झाला आणि पतीने पीडितेला मारहाण करून शारीरिक आणि मानसिक त्रास दिला. त्याने पीडितेचे आठ तोळे सोन्याची दागिने ताब्यात घेतले, त्यामुळे त्रस्त होऊन पीडितेने नाशिकमध्ये माहेरी राहण्यास सुरुवात केली. दोन दिवसांपूर्वी त्याने कुरिअरद्वारे पीडितेला एक पत्र पाठवले, ज्यामध्ये तिहेरी तलाक देण्याचा प्रयत्न केला असल्याचे नमूद आहे.
या घटनेमुळे समाजात महिलांच्या विवाहिक हक्कांच्या सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे. तिहेरी तलाक ही पद्धत कायदेशीरदृष्ट्या बंद असून कोणत्याही माध्यमातून ती अमलात आणणे गुन्हा ठरते. नाशिक पोलिसांनी तत्काळ कारवाई करत महिला सुरक्षिततेसाठी आणि कायदेशीर संरक्षणासाठी महत्वाची पावले उचलली आहेत.
