वाहतुकीचे चक्रव्यूह आणि मनस्ताप
हा रस्ता केवळ रहिवाशांसाठीच नाही, तर शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरदार आणि व्यापाऱ्यांसाठी जीवनवाहिनी आहे. रस्ता बंद झाल्यामुळे आता धामणकर कॉर्नर, शरणपूर सिग्नल, मायको सर्कल आणि गडकरी चौक या आधीच गजबजलेल्या भागांवर वाहतुकीचा अतिरिक्त ताण येणार आहे. यामुळे सकाळ-संध्याकाळ वाहनधारकांना भीषण वाहतूक कोंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
advertisement
चोरीचा नवा फंडा, पोलीस बनवून रस्त्यावर वाहनांना अडवायचे; 13 लाख लुटले, अखेर भांडाफोड
व्यापाऱ्यांची चिंता, नागरिकांचा अविश्वास
प्रशासनाने अंतर्गत रस्ते खुले ठेवले असले तरी अवजड वाहनांना बंदी घातली आहे. परिणामी, स्थानिक व्यावसायिकांच्या मालवाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अधिकाऱ्यांनी काम लवकर पूर्ण करू असे आश्वासन दिले असले, तरी नाशिककरांचा अनुभव वेगळा आहे. यापूर्वीची अनेक कामे रखडल्याने प्रशासनाच्या शब्दावर विश्वास कसा ठेवायचा? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
कसा असेल वाहतुकीचा नवा मार्ग?
काँक्रिटीकरणाचे काम दोन टप्प्यांत राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात टिळकवाडी सिग्नल ते हॉटेल सिटी प्राइज या कालावधीत टिळकवाडीकडून जलतरण सिग्नलकडे जाणारी वाहतूक राणे डेअरी, राका कॉलनी किंवा कुलकर्णी गार्डन मार्गे होलाराम कॉलनीतून मायको सर्कलकडे वळविण्यात येईल, तर दुसऱ्या टप्प्यात हॉटेल सिटी प्राइड ते जलतरण सिग्नल या टप्प्यात सिटी प्राइड टी-पॉइंटवरून उजवीकडे वळण घेऊन वाहतूक होलाराम कॉलनी मार्गे वळविण्यात येणार आहे.






