TRENDING:

गाडीत पेट्रोल भरायचं की नाही? संपाबद्दल मालेगावच्या HP, इंडियन ऑयल डेपोतून मोठी बातमी

Last Updated:

नाशिक जिल्ह्यातील अनेक पंप चालू राहु शकणार नाहीत. इंधन भरण्यासाठी पंपावर वाहनधारकांनी मोठी गर्दी केली होती. आज संप नाही मिटला तर केवळ नाशिक जिल्ह्यातीलचं नव्हे राज्यातील अनेक भागात इंधन तूट निर्माण होण्याची चिन्हे आहेत. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नाशिक, 02 जानेवारी : टँकर, ट्रक चालक, आरटीओ अधिकारी, ऑइल कंपन्याचे अधिकारी आणि पोलीस प्रशासन यांची मनमाडच्या पानेवाडी येथील सोमवारी रात्री पार पडलेली बैठक निष्फळ ठरली. जवळपास 3 तास चालेल्या बैठकीत काहीच तोडगा निघाला नाही. आज सलग दुसऱ्या दिवशीही संप सुरूच राहणार आहे.
News18
News18
advertisement

केंद्र शासनाने लागू केलेल्या नवीन मोटार अधिनियमाच्या विरोधात टँकर, ट्रक चालकांनी सुरू केलेला संप मिटवण्यासाठी सोमवारी रात्री मनमाडच्या पानेवाडी येथे आरटीओ, ऑइल कंपन्याचे अधिकारी आणि पोलीस प्रशासन यांनी वाहन मालकांसोबत बैठक घेतली. मात्र, 3 तास चाललेल्या या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. टँकर, ट्रक चालक संपावर ठाम असल्यामुळे आज सलग दुसऱ्या दिवशीही त्यांचा संप सुरूच आहे.

advertisement

Petrol Pump : राज्यभरात पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची तोबा गर्दी, नेमकं काय घडलं?

मनमाडच्या पानेवाडी भागात असलेल्या भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल, हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्याच्या प्रकल्पातून सुमारे 2 हजार टँकर, ट्रकच्या माध्यमातून केला जाणारा पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर पुरवठा ठप्प झाला आहे. त्यामुळे मनमाड, येवला, मालेगावसह नाशिक जिल्ह्यातील अनेक पंप चालू राहु शकणार नाहीत. इंधन भरण्यासाठी पंपावर वाहनधारकांनी मोठी गर्दी केली होती. आज संप नाही मिटला तर केवळ नाशिक जिल्ह्यातीलचं नव्हे राज्यातील अनेक भागात इंधन तूट निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

advertisement

देशभरातील या राज्यात वाढणार थंडीचा कडाका! जाणून घ्या महाराष्ट्रातील स्थिती

केंद्र सरकारच्या मोटर वाहन कायद्याविरोधात देशभरात वाहन चालक संघटनेकडून विरोध करण्यात येत आहे. राज्यातील विविध जिल्ह्यातील सर्व पेट्रोलियम कंपनीच्या टँकर चालकांसह विविध वाहन चालक संघटनांकडून देखील आंदोलन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आजपासून बेमुदत संप करण्यात येणार आहे. पेट्रोल पंप वाहनधारक देखील या संपात सहभागी होणार असल्याने पेट्रोलचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहनचालकांची पेट्रोल भरण्यासाठी धांदल उडाली आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
गाडीत पेट्रोल भरायचं की नाही? संपाबद्दल मालेगावच्या HP, इंडियन ऑयल डेपोतून मोठी बातमी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल