Weather Update: देशभरातील या राज्यात वाढणार थंडीचा कडाका! जाणून घ्या महाराष्ट्रातील स्थिती
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Weather Update 2 January 2024: 2 जानेवारी रोजी दक्षिण उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या काही भागात हलका विखुरलेला पाऊस पडू शकतो आणि दुसऱ्या दिवशी वाढू शकतो. जाणून घेऊया देशभरासह महाराष्ट्रात कसं असेल वातावरण...
नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या प्रचंड थंडी आहे. मात्र येत्या काही दिवसांत थंडीची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) 5 ते 11 जानेवारी दरम्यान मध्य भारतातील काही भागात तापमानात घट आणि थंडीची लाट वाढण्याची शक्यता वर्तवलीये. IMD ने 5 ते 11 जानेवारी दरम्यान तापमानात घट होण्याचा अंदाज वर्तवलाय. ज्यामुळे काही उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट निर्माण होईल.
उत्तर महाराष्ट्रात शीतलहर
IMD च्या म्हणण्यानुसार, या काळात रात्रीच्या तापमानात घट झाल्याने मध्य भारतातील काही भागात थंडीची लाट येऊ शकते. विशेषत: मध्य प्रदेश, उत्तर महाराष्ट्र, दक्षिण उत्तर प्रदेश, हरियाणा आणि राजस्थानमध्ये दिवसाचे तापमान देखील सरासरीपेक्षा कमी राहण्याची अपेक्षा आहे. ज्यामुळे दिवसातही वातावरणात गारवा राहील. आयएमडीने पूर्व आणि पश्चिम उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर व्यतिरिक्त, जानेवारी महिन्यात लडाखमध्ये सामान्यपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
advertisement
पुढील तीन दिवसांत लक्षद्वीपमध्ये मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे (ताशी 40-50 किमी पर्यंत) येण्याची शक्यता IMD ने वर्तवली आहे. यासोबतच मच्छिमारांना समुद्रात जाऊ नये असा सल्लाही आयएमडीने दिलाय. IMD च्या अंदाजामध्ये उत्तर-पश्चिम आणि पूर्व भारतातील काही मैदानांवर दाट धुक्याचा समावेश आहे. उत्तर प्रदेश आणि उत्तर राजस्थानच्या भागात कोल्ड-डेपासून तर गंभीर कोल्ड-डेची स्थिती राहण्याचा अंदाज आहे.
advertisement
स्कायमेट वेदरनुसार, 2 जानेवारी रोजी दक्षिण उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या काही भागात हलका विखुरलेला पाऊस संभवतो आणि दुसऱ्या दिवशी तो वाढू शकतो. पंजाब आणि हरियाणाच्या अनेक भागांमध्ये, उत्तर प्रदेशच्या काही भागात आणि उत्तराखंड आणि राजस्थानच्या काही ठिकाणी दाट ते दाट धुके पडू शकते. जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्कीम, बिहार, झारखंड, ओडिशा आणि ईशान्य भारताच्या काही भागात दाट धुके पडू शकते. पंजाबच्या अनेक भागांमध्ये दिवसाही तीव्र थंडीची शक्यता आहे. हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये थंडीची स्थिती निर्माण होऊ शकते.
view commentsLocation :
New Delhi,Delhi
First Published :
January 02, 2024 6:49 AM IST
मराठी बातम्या/देश/
Weather Update: देशभरातील या राज्यात वाढणार थंडीचा कडाका! जाणून घ्या महाराष्ट्रातील स्थिती


