Crime News: अंगवाडी सेविकेचा नवरा आणि दिरावर गोळाबार; देशी कट्टा घेऊन पोहचली ठाण्यात; नेमकं काय घडलं?
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Crime News: घरगुती वाद आणि जमिनीच्या वादातून महिलेने हे कृत्य केले. महिला अंगणवाडी सेविका आहे. या महिलेने देशी बनावटीचे पिस्तुल घेऊन पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले आहे.
उज्जैन, प्रतिनिधी : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी उज्जैनमधून हत्येची एका धक्कादायक बातमी समोर आली आहे. महिलेने पती आणि दिरावर देशी बनावटीच्या पिस्तुलाने गोळीबार केला. यात नवऱ्याचा जागीच मृत्यू झाला, तर दिराचाही काही वेळाने मृत्यू झाला. या प्रकरणातील समोर आलेल्या व्हिडिओमध्ये ही महिला हातात पिस्तूल घेऊन जाताना दिसत आहे. या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली आहे.
अतिरिक्त एसपी नितीश भार्गव यांनी सांगितले की, घरगुती वाद आणि जमिनीच्या वादाच्या रागातून महिलेने हे कृत्य केले. महिला अंगणवाडी सेविका आहे. या महिलेने देशी बनावटीचे पिस्तुल घेऊन पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले आहे. एफएसएल पथकाकडून तपास करण्यात येत असून पुरावे गोळा करण्यात येत आहेत. ही घटना सोमवारी सकाळी घडल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपी महिला इंगोरिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंगणवाडी सेविका आहे. घरात काही कौटुंबिक आणि जमिनीचा वाद होता. यामुळे महिलेने प्रथम आपल्याच पतीवर गोळीबार केला. यावेळी दिर त्याला वाचवण्यासाठी आला असता त्याच्यावरही गोळीबार करण्यात आला. यात पतीचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, भावाचा रुग्णालयात उपाचारादरम्यान मृत्यू झाला.
advertisement
जमीनीच्या वादातून हत्या झाल्याचा संशय
दिराकडे काही जमीन वगैरे होती. महिलेला जमीन घ्यायची होती, पण पती या प्रकरणात रस घेत नव्हता. यामुळे पत्नीने संतापून दोघांवर गोळीबार केला. आरोपी महिलेला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक नितीश भार्गव म्हणाले की, पोलीस अधीक्षकांच्या निर्देशानुसार एफएसएलचे पथक पाठवून तपास करण्यात येत आहे. FSL टीम नुकतीच आली आहे. सुमारे 8 ते 10 गोळ्या झाडल्याची माहिती आहे.
Location :
Ujjain,Madhya Pradesh
First Published :
January 02, 2024 6:01 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Crime News: अंगवाडी सेविकेचा नवरा आणि दिरावर गोळाबार; देशी कट्टा घेऊन पोहचली ठाण्यात; नेमकं काय घडलं?