TRENDING:

nashik one day trip : नाशिकमध्ये एका दिवसात पाहता येतील ही 5 ऐतिहासिक मंदिरे

Last Updated:

प्रभू श्रीरामाने आपल्या वडिलांचे श्राद्धदेखील पंचवटीजवळील गोदाघाटावर केले होते. त्यामुळे अनेक नागरिक या ठिकाणी अस्ती विसर्जन करण्यासाठी येत असतात, असे सांगितले जाते. इतकेच नव्हे तर नाशिक हे पर्यटनाच्या दृष्टीनेही ओळखले जाते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कुणाल दंडगव्हाळ, प्रतिनिधी
advertisement

नाशिक : नाशिक शहर हे निसर्गरम्य वातावरणासाठी ओळखले जाते. या ठिकाणी सर्वात सुंदर अशा अनेक गोष्टी आहे. धबधबे तसेच किल्ले नाशिक शहराला एक वरदान रुपी भेट मिळाले आहेत.

सर्वात मोठा कुंभमेळाही नाशिकमध्ये भरतो. प्रभू श्रीरामाच्या वनवासातील मुख्य भाग म्हणून ओळखले जाणारे हे शहर आहे. रावणाची बहीण म्हणून ओळखली जाणारी शूर्पणखाचे नाक लक्ष्मणाने या ठिकाणी कापले होते. त्यामुळे या शहराला नासिक असे नाव पडले आहे, असे सांगितले जाते.

advertisement

प्रभू श्रीरामाने आपल्या वडिलांचे श्राद्धदेखील पंचवटीजवळील गोदाघाटावर केले होते. त्यामुळे अनेक नागरिक या ठिकाणी अस्ती विसर्जन करण्यासाठी येत असतात, असे सांगितले जाते. इतकेच नव्हे तर नाशिक हे पर्यटनाच्या दृष्टीनेही ओळखले जाते. त्यामुळे जर तुम्ही नाशिकमध्ये फिरण्यासाठी आलात तर याठिकाणी एक दिवसात फिरत येणारी मंदिरे नेमकी कोणती आहे, हे आपण जाणून घेऊयात.

advertisement

नाशिकमध्ये सर्वात आधी अति प्राचीन मंदिर म्हणून ओळखले जाणारे कपालेश्वर महादेव मंदिर आहे. हे मंदिर नाशिक येथील प्रसिद्ध असलेल्या पंचवटी भागातील गोदावरी नदीच्या काठी आहे. या मंदिरात गेल्यावर 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतल्याचे पुण्य मिळते.

ठाण्यात एकाच ठिकाणी मिळते 10 पेक्षा अधिक प्रकारची पावभाजी, खवय्यांची होते मोठी गर्दी, लोकेशन काय?

advertisement

तसेच या भागातील थोड्या अंतरावर असलेले पंचवटी परिरसतीलच दुसरे मंदिर काळाराम मंदिर आहे. या मंदिराचे वैशिट्य असे कि स्वयं प्रभू श्रीराम या ठिकणी माता सीता आणि लक्ष्मणासोबत वास्तव्यास होते. या मंदिरात प्रभू श्रीरामाची आणि सीतामाता व लक्ष्मणाची मूर्ती सोबत आहे. तसेच ती अखंड काळ्या पाषाणात बनविली आहे. यासोबतच मुख्य पंचवटी म्हणून ओळखली जाणारी पंचवटी हे काळाराम मंदिराच्या बाजूला आहे.

advertisement

तिसरे मंदिर असलेले माता सीतेची गुफा आहे. असे म्हंटले जाते कि माता सीता या गुफेतच असताना रावणाने त्यांचे अपहरण केले. ह्या गुफेत माता सीतेने ठेवलेले शिवपिंड आहे.

विश्व भ्रमण दिंडीचे आयोजन, मलेशियात घुमला हरीनामाचा गजर, डोळे दिपवणारा सोहळा, VIDEO

तसेच नाशिक शहरातील सुप्रसिद्ध असे नवश्या गणपती मंदिर देखील आहे. गंगापूर रोडवरील हे गणपती बाप्पाचे प्रसिद्ध असे मंदिर आहे. या मंदिराचे वैष्टिय असे की, भाविक श्रद्धेने या ठिकाणी जो काही नवस मागतात तो नवस पूर्ण होतो, अशी भाविकांची भावना आहे. आपला नवस पूर्ण झाला की, भाविक आपल्या श्रद्धेने या ठिकाणी घंटी किंवा मोठे घंटे हे बांधून आपला नवस पूर्ण करत असतात. हेदेखील गोदावरी नदीचा एका किनाऱ्यावरील सुंदर असे मंदिर आहे.

त्याचप्रमाणे नाशिक मधील प्रसिद्ध असे पाचवे मंदिर हे सोमेश्वर मंदिर आहे. हे मंदिर देखील गंगापूर रोडवरच आहे. ह्या मंदिराचे मुख्य वैशिष्टय असे की, शंकराने ब्रम्हहत्या केल्यानंतर पृथ्वीवर भ्रमण करीत असताना याच ठिकाणी नंदीकडून आपले पाप नष्ट करण्याची कल्पना त्यांनी ऐकली होती. या मंदिराच्या मागे सोमेश्वर धबधबा देखील आहे. नाशिक शहर हे ऐतिहासिक गोष्टींसाठी ओळखले जाते. अशाप्रकारे तुम्ही याठिकाणी ही मंदिरे एका दिवसात फिरू शकतात.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
nashik one day trip : नाशिकमध्ये एका दिवसात पाहता येतील ही 5 ऐतिहासिक मंदिरे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल