एमपीएससी उमेदवारांसाठी मोठी बातमी, राज्यसेवा पूर्व परीक्षेची तारीख बदलली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 8 ऑक्टोबर रोजी उद्घाटन होणार आहे. आज (26 सप्टेंबर) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यातील पूरस्थितीची माहिती तसेच भरीव आर्थिक मदतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. या भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसोबत संवाद साधताना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाबाबतची माहिती दिली आहे. पंतप्रधान मोदी विमानतळाच्या उद्घाटनासोबतच मुंबईतील मेट्रो-३चे आणि मेट्रो- 2 बीचेही उद्घाटन पंतप्रधानांच्याच हस्ते होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
advertisement
पगारदार नोकरापेक्षा पवनचं नाश्ता सेंटर भारी, दिवसाचा गल्ला फक्त 9 हजार रुपये
अलीकडेच, एअर इंडिया समूहाने नवी मुंबई विमानतळावरून एअर इंडिया एक्सप्रेसची 20 विमाने उड्डाणे घेणार असल्याचे जाहीर केले होते. देशातील 15 शहरांमध्ये या विमानतळावरून उड्डाणे होणार आहेत. भविष्यात एअर इंडिया समूहाच्या 55 ते 60 विमानांचे उड्डाण करण्याचा विचार आहे. 8 ऑक्टोबरला पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर विमानतळाची पाहणी करण्यात येणार आहे. उद्घाटनाच्या दिवशी नवी मुंबई विमानतळावरून पहिल्या विमान उड्डाणाची औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर विमानतळ परिसर ‘सीआयएसएफ’च्या ताब्यात दिले जाणार आहे. त्यानंतर ४५ दिवस विमानतळ आणि परिसराचे स्कॅनिंग करून संपूर्ण परिसर ‘सीआयएसएफ’द्वारे सुरक्षित केला जाणार आहे. त्यामुळे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात नवी मुंबईतून व्यावसायिक विमानांच्या उड्डाणाला सुरुवात होणार आहे.
कोकणातून पश्चिम महाराष्ट्रात धावणार रेल्वे, कोणती दोन शहरं जोडणार?
पंतप्रधानांच्या दौऱ्याची आखणी अंतिम टप्प्यात असून, गुरुवारपासून संबंधित सरकारी विभागांमध्ये बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. सद्यस्थितीत ‘एमएमआरसीएल’ची मेट्रो-३ ही बीकेसी ते आरेपर्यंत धावत आहे. मात्र आता उद्घाटनानंतर ही मेट्रो कुलाबा ते बीकेसी अशी ३५ किलोमीटर धावणार आहे. तर मेट्रो-२ बी ही मंडाले ते डायमंड नगर यादरम्यान धावणार असून, या मार्गावर चार स्थानके आहेत.