एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाचा माळेगांव च्या सभेला महिला आल्या आहेत. तुम्हाला पैसे देऊ आणलं का? कारण दोन दिवसापूर्वी पैसे देऊन सभेला आणलं गेलं. असं कधीच आजपर्यंत झालं नव्हतं. मात्र ही पद्धत अतिशय चुकीची आहे. मी उद्या सभा घेणार आहे. ते पण सभा घेणार आहेत. ते त्यांचा विचार मांडतील, मी माझा विचार मांडणार आहे. पुढच्या पिढी साठी कुणाला साथ द्यायची हे ठरवा असं आवाहन अजित पवार यांनी केलं.
advertisement
मी न मागता सगळं करतोय. याची तुम्हाला किंमत कळत नाही. मी कॅनॉलचे पाणी आणले नसतं तर ऊसाची पाचट झाली असती. विनंती करणे माझं काम आहे. मतदार म्हणून निर्णय तुमचा आहे.
पवार साहेबांनी रिटायर झाले मग बारामती कडे कोण लक्ष देऊ शकतो. लोकसभेला साहेबांना साथ दिली. साहेबांनी सांगितलं तीस वर्ष साहेब, तीस वर्ष अजितला संधी दिली. अरे बारामतीत पवारांशिवाय दुसरं कोण नाही का? आयुष्यभर पवार राहणार का? बाकीच्यांनी काय गोट्या खेळायच्या का? असा सवाल अजित पवार यांनी विचारला.
