नियोजित वेळेनुसार आज दुपारी दोन वाजता विधिमंडळात गटनेते निवडण्यासाठीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत सर्वानुमते सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. नेता निवडीच्या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ, ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, ज्येष्ठ नेते धनंजय मुंडे, तसेच महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, राष्ट्रवादीचे सगळेच मंत्री, पक्षाचे विधानसभा आणि विधान परिषदेचे सगळेच आमदार उपस्थित होते. या आमदारांनी एकमताने सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
advertisement
शपथेपर्यंत पुढची प्रक्रिया काय काय असणार?
राष्ट्रवादी पक्षाचे निवडक नेते थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी येणार
राष्ट्रवादी पक्षाने गटनेते म्हणून सुनित्रा पवार यांची निवड झाली आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांना देणार.
त्यानंतर मुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदासाठी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे शिफारस करतील.
मुख्यमंत्री निवासस्थानाहून सुनेत्रा पवार यांच्या नावाचे शिफारस करणारे पत्र राज्यपाल यांना पाठविण्यात येईल.
त्यानंतर ५.३० मिनिटांनी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.
ही प्रक्रिया पुढील २ तासात पार पडेल.
त्यानंतर सायंकाळी सुनित्रा पवार यांना कोणते खाते द्यायचे या संदर्भात शासन निर्णय जारी केला जाणार.
