जालना शहरातील जेईएस महाविद्यालयाचा लोककला विभाग मागील तीन वर्षांपासून लोककला प्रशिक्षण शिबिर आयोजित करत आहे. यावर्षी महाराष्ट्र शासनाच्या लोककला विभागाच्या पुढाकाराने शाहिरी शिबिर संपन्न होत आहे. शिबिरात राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील 20 विद्यार्थी सहभागी झाले आहेत. त्यांच्या राहण्याची व्यवस्था महाविद्यालयातच करण्यात आली.
21 वर्षे एसटी सेवा, कुठेही..., एका चालकाचा असाही सन्मान, Video पाहुन कराल कौतुक
advertisement
या प्रशिक्षण शिबिरात शाहीरी या कला प्रकारची शिकवण देण्यात आली आहे. या प्रकारात पडणारे वेगवेगळे भाग शिकविण्यात आले. जसे की, शाहीरी पोवाडा, फक्कड, फटका, शिवगीते इत्यादी शिकवण्यात आले. विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी राज्यातील नामवंत शाहीर या ठिकाणी आले. या कार्यक्रमासाठी सर्वांना यावे, असं आवाहन प्रा. कल्याण उगले यांनी केलं आहे.
या शिबिरात आम्हाला फक्त गाणं म्हणायला शिकवलं नाही. तर गाण्याची निर्मिती कशी होते. उगम कसा होतो. कशी शब्दरचना केली जाते. ते गाणं तालासुरात कसं बसवलं जातं हे देखील शिकवण्यात आलं. त्याचबरोबर केवळ शाहीर होऊन चालणार नाही. तर शाहिराने आधी माणूस म्हणून कसं, असावं हे देखील सांगितलं. त्यामुळे हे शिबिर अतिशय उपयुक्त ठरलं, अशी भावना विश्वजीत उगले यांनी व्यक्त केली.





