फेर करण्यासाठी घेतली 3000 हजारांची लाच, जालन्यात तलाठी ACB च्या जाळ्यात
- Reported by:Kale Narayan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
जमिनीचा फेर मंडळ अधिकारी यांच्याकडे पाठवण्यासाठी 3000 रूपयांची लाच स्वीकारताना जालन्यातील तलाठी लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात अडकला आहे.
जालनाः जमिनीचा फेर मंडळ अधिकारी यांच्याकडे पाठवण्यासाठी 3000 रूपयांची लाच स्वीकारताना जालन्यातील तलाठी लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. संबंधित तलाठ्यावर तालुका जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
लाखो रुपये पगार असलेला अधिकारी आणि कर्मचारी वर्गाकडून वारंवार सामान्य माणसाची हेटाळणी होत असल्याचे पाहायला मिळते. याचाच प्रत्यय जालना शहरात आला. मयत झालेल्या वडिलांचा जमिनीचा वारसा हक्काने फेर करण्यासाठी आरोपी ग्राम महसूल सहायक गजानन बारवाल यांनी तक्रारदार यांना 5000 रूपयांची लाच मागितली.
तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याची लेखी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजीनगरला दिली. दिनांक 28 जानेवारी रोजी तक्रारीची शासकीय पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली. तडजोडीअंती 3000 रुपये स्वीकारण्याचे आरोपी तलाठ्याने मान्य केले. त्यानंतर 28 जानेवारी रोजी तलाठी यांच्या खाजगी कार्यालयासमोरील रस्त्यावर तक्रार यांच्याकडून 3000 रुपये लाच स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आरोपीला ताब्यात घेतले.
advertisement
सदरील कारवाईमुळे जिल्ह्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यात खळबळ उडाली आहे. कोणालाही सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी कामासाठी लाचेची मागणी करत असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
Jan 28, 2026 9:42 PM IST









