पश्चिम महाराष्ट्रात भाजपने सर्वाधिक २४ जागा जिंकल्या. त्याखालोखाल राष्ट्रवादीने ११ जागी बाजी मारली. महायुतीला पश्चिम महाराष्ट्रात ३२ आणि अपक्ष ४ अशा मिळून ४६ जागा जिंकता आल्या. तर महाविकास आघाडीला पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार गटाच्या ७, ठाकरेंच्या दोन तर काँग्रेसला एक अशा १० जागांवरच विजय मिळवता आला.
गेल्या तीन दशकांपासून पश्चिम महाराष्ट्र हा शरद पवार यांचा गड मानला जात होता. राष्ट्रवादी काँग्रेसचं या विभागात एकहाती वर्चस्व होतं. गेल्या निवडणुकीत पुण्यात २१ पैकी ११ जागा राष्ट्रवादीने जिंकल्या होत्या. यावेळी पूर्ण पश्चिम महाराष्ट्रात त्यांना फक्त ७ जागांवरच समाधान मानावं लागलंय.विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अद्याप शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही. निकालावर त्यांनी मौन बाळगलं आहे.
advertisement
शरद पवारांविरुद्ध अजितदादांनी मारली बाजी
विधानसभा निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवार हे 37 जागांवर आमनेसामने आले. लोकसभेत अजित पवार आणि शरद पवार आमनेसामने आले होते. त्यात शरद पवार सरस ठरले. आता मात्र, अजित पवारांनी त्या पराभवाची सव्याज परतफेड केली. अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी केली. अजित पवारांनी 37 पैकी 27 जागांवर विजय मिळवला. तर शरद पवार गटाची 8 जागांवर सरशी झाली. उर्वरित 2 जागांवर इतर उमेदवार विजयी झाले.
