सांगलीतील सांगलीवाडीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमाच्यावेळी जयंत पाटील बोलत होते. त्यावेळी जयंत पाटील यांनी तुफान फटकेबाजी केली. यावेळी मंत्री जयकुमार गोरे, खासदार विशाल पाटील, आमदार सुहास बाबर आदी उपस्थित होते.
जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात म्हटले की, नदीत जास्त होड्या झाल्या की शहाण्याने काठ कधी सोडू नये, आमच्यातले अनेकजण तिकडे गेले आहेत. त्यांना विशालनेच सांगितले असेल तिकडे जावा म्हणून आणि विशाल पाटील कधी काय करेल याचा नेम नाही, अशी मिश्किल टिप्पणी जयंत पाटील यांनी केली. त्यांच्या या वक्तव्यावर चांगलाच हशा पिकला होता. तर व्यासपीठावर अनेक पक्षातील नेते मंडळी उपस्थित होते.
advertisement
जयंत पाटील यांनी पुढे म्हटले की, आमदार सुहास बाबर पण तिकडे गेले आहेत. त्यांच्याकडेही खूप होड्या झाल्या आहेत. नदीत लय होड्या असल्या की काठ सोडू नये. त्यामुळे कोण कुठल्या होडीत बसलंय हे कळायला अवघड होते. तर 2029 च्या वेळी कोण कोणाला उमेदवारी देणार याची उत्सुकता लागली असल्याची फटकेबाजी जयंत पाटील यांनी केली.