TRENDING:

अजित पवारांकडे असलेली खाती कुणाला देणार? राष्ट्रवादी उद्या CM फडणवीसांना पत्र लिहिणार

Last Updated:

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुक्रवारी अजित पवार यांच्याकडील खाती कुणाकडे देण्यात यावी, संदर्भात पत्र लिहिणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाबाबत मोठा पेच निर्माण झाला असून आता पुढची सूत्रे कोण सांभाळणार, असा प्रश्न कार्यकर्ते विचारीत आहेत. तसेच दादांच्या निधनानंतर त्यांच्याकडील खाते कुणाकडे जाणार, अशी चर्चा पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. याच संदर्भाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुक्रवारी पत्र लिहिणार आहे.
अजित पवार-देवेंद्र फडणवीस
अजित पवार-देवेंद्र फडणवीस
advertisement

अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादीच्या वाट्याची खाती असल्याने ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मिळावी यासाठी उद्या पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीतील विश्वसनीय सूत्रांनी दिली.

अजित पवार यांच्याकडील खाती कुणाकडे?

अजित पवार यांच्याकडे सध्या क्रीडा, राज्य उत्पादन शुल्क आणि अर्थ खात्याची जबाबदारी होता. माणिकराव कोकाटे यांच्याकडून क्रीडा खाते काढून घेण्यात आल्यानंतर त्यांनी ते खाते आपल्याकडेच ठेवले. अर्थखात्यासहित तीन खात्यांची जबाबदारी अजित पवार यांच्याकडे होती. ही खाती पक्षातील कोणत्या नेत्यांकडे द्यावीत, याचसंदर्भाने पुढच्या दोन दिवसांत चर्चा होऊन शिक्कामोर्तब केले जाईल, असे कळते. अद्याप तरी अजित पवार यांच्याकडील खाती कुणाकडे दिली जाणार, हे गुलदस्त्यात आहे.

advertisement

राष्ट्रवादीचे नेतृत्व कुणाकडे?

अजित पवारांच्या यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व कोण करणार आणि पक्षाची भविष्यातील वाटचाल कशी असणार, याची चर्चा सुरू झाली आहे. अजित पवार यांच्या माघारीनंतर पवार कुटुंबातील कोणत्या नेत्याकडे पक्षाची सूत्रे जाणार याविषयी चर्चा होत आहेत. प्रादेशिक पक्षावर कुटुंबशाहीचे वर्चस्व आढळून येते. तसेच पवार म्हणजे राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी म्हणजे पवार हे रुढार्थाचे समीकरण असल्यामुळे पवार कुटुंबातीलच कुणाहीकडे नेतृत्व जाईल, असे सांगितले जाते.

advertisement

जयंत पाटील, शशिकांत शिंदे, हर्षवर्धन पाटील यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, सोयाबीन दर पुन्हा घसरले, कांद्याची काय स्थिती?
सर्व पहा

अजित पवार यांच्यावर अंतिम संस्कार पार पडल्यानंतर बारामतीमधील सहयोग सोसायटीतील निवासस्थानी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, शशिकांत शिंदे, हर्षवर्धन पाटील यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. या सगळ्यात नेत्यांनी सुनेत्रा पवार आणि पार्थ-जय पवार यांचे सांत्वन केले.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अजित पवारांकडे असलेली खाती कुणाला देणार? राष्ट्रवादी उद्या CM फडणवीसांना पत्र लिहिणार
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल