राज्यात आघाडी व युती असून दोन्ही बाजूने तीन तीन पक्ष आहेत. निवडणुक झाल्यावर आघाडी येते की युती येते यापेक्षा प्रत्येक पक्षाचे किती उमेदवार निवडून येतात हे महत्वाचं असून त्यानंतर खरं गणित सुरू होणार असल्याचे म्हटले जात आहे.
निवडणूक निकालानंतर काही समीकरणे बदलू पण शकतात, असेही दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले. सत्ता स्थापनेसाठी बहुमत न मिळाल्यास सरकारची जुळवाजुळव करण्यासाठी आकडेमोड करावीच लागणार असून निवडणूक रिंगणात 6 पक्ष असल्याने गणिते जुळवायला भरपूर वाव असल्याचा अंदाज दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला.
advertisement
राज्यात अनेक ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत असल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी बंडखोरी झाली आहे. तर, जागा वाटपाचा घोळ हा अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सुरू होता. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला अधिक जागा मिळाल्या. मात्र, महायुती आणि मविआमध्ये मतांचे अंतर फार नव्हते. त्यामुळे विधानसभेची निवडणूक चुरशीची होणार असल्याचे म्हटले जात आहे.
