सिंधुदुर्ग: महाराष्ट्राच्या राजकारणात उद्या सिंधुदुर्गातून मोठा संदेश जाणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत असून कणकवली येथे दुपारी साडेतीन वाजता त्यांची जाहीर प्रचार सभा होणार आहे. या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे, कारण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी तब्बल सात जिल्हा परिषद सदस्य आणि आठ पंचायत समिती सदस्य बिनविरोध निवडून आणत राजकीय ताकद दाखवून दिली आहे. या यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नितेश राणे यांचे जाहीर कौतुक आणि सत्कार केला जाणार आहे.
advertisement
दरम्यान, या सभेत आणखी एक मोठी राजकीय घडामोड घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकेकाळी नारायण राणे यांचे कट्टर समर्थक आणि नंतर कट्टर विरोधक बनलेले जिल्हा बँकेचे माजी चेअरमन सतीश सावंत हे तब्बल सात वर्षांनंतर ठाकरे सेनेला सोडचिट्टी देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. जर उद्या हा प्रवेश झाला, तर ठाकरे सेनेसाठी हा सिंधुदुर्गात मोठा राजकीय धक्का मानला जाऊ शकतो. सिंधुदुर्ग जिल्हा महायुती पंचायत समिती एकूण महायुतीचे 17 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
सिंधुदुर्गात आतापर्यंत बिनविरोध निवडून आलेल्यांची यादी
कणकवली तालुका (बिनविरोध)
- प्राची इस्वलकर(भाजप) (खारेपाटण जि.प.उमेदवार)
- रुहिता राजेश तांबे (शिवसेना शिंदे गट) (जाणवली जि.प.उमेदवार)
देवगड जिल्हा परिषद (बिनविरोध)
- सुयोगी रवींद्र घाडी (भाजप) (पडेल जिल्हा परिषद)
- अवनी अमोल तेली (भाजप) (बापर्डे जिल्हा परिषद)
- अनुराधा महेश नारकर (भाजप ) (पोंभुर्ले जिल्हा परिषद)
- सावी लोके (भाजप ) (किंजवडे जिल्हा परिषद)
वैभववाडी तालुका जिल्हा परिषद
- प्रमोद रावराणे (भाजप) (कोळपे जिल्हा परिषद)
सावंतवाडी जिल्हा परिषद
- प्रमोद कामत (भाजप) (बांदा जिल्हा परिषद)
कणकवली तालुका पंचायत समिती महायुती
- बिडवाडी - संजना संतोष राणे (भाजप )
- वरवडे - सोनू सावंत (भाजपा)
- नांदगाव - हर्षदा वाळके (भाजप)
- हरकुळ बुद्रुक - दिव्या पेडणेकर (भाजप)
- नाटळ - सायली कृपाळ (भाजप)
- जाणवली - महेश्वरी चव्हाण (भाजप)
देवगड तालुका पंचायत समिती बिनविरोध
- पडेल –अंकुश यशवंत ठूकरूल (भाजप)
- नाडण –गणेश सदाशिव राणे (भाजप)
- बापर्डे –संजना संजय लाड (भाजप)
- फणसगाव - समृध्दी चव्हाण ( भाजप)
- शिरगाव - कुमारी शीतल तावडे (भाजप)
- कोटकामते - ऋतुजा खाजनवाडकर (भाजप)
वैभववाडी तालुका पंचायत समिती बिनविरोध
- कोकिसरे - साधना सुधीर नकाशे (भाजप)
मालवण पंचायत समिती बिनविरोध
- आडवली - मालडी - सीमा परुळेकर (भाजप)
वेंगुर्ला पंचायत समिती
- आसोली - संकेत धुरी (भाजप)
सावंतवाडी पंचायत समिती
- शेर्ले - महेश धुरी ( भाजप)
दोडामार्ग पंचायत समिती
- कोलझर -गणेशप्रसाद गवस ( शिवसेना शिंदे गट )
