नितीन गडकरी म्हणाले, राजकारण हे सामाजिक आर्थिक परिवर्तनाचे साधन आहे. राजकारणात जनता जातीवादी नाही तर राजकीय नेते हे जातीयवाद करतात. माणूस हा जातीने मोठा नाहीतर गुणांनी मोठा आहे. या समाजातली जातीयता समूळ नष्ट झाली पाहिजे.आपण कमीत कमी ती आपल्या व्यवहारात नाही ठेवली पाहिजे.
सामाजिक जीवनामध्ये राजकारणाचा अर्थच समाजकारण : नितीन गडकरी
advertisement
नितीन गडकरी यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. नितीन गडकरी म्हणाले, माझा मुलगा आहे म्हणून त्याला राजकारणात स्थान मिळेल हे मला मान्य नाही. त्यांनी त्याच्या बळावर त्याचे स्थान निर्माण करावे. आमदाराच्या पोटातून आमदार नाही झाला पाहिजे, खासदाराच्या पोटातून खासदार नाही झाला पाहिजे. जे लोक आपलं कर्तृत्व सिद्ध करतात त्यांना हा पूर्ण अधिकार आहे. कुणाचा मुलगा, मुलगी असणे गुन्हा नाही. आज आपल्या सामाजिक जीवनामध्ये राजकारणाचा अर्थच समाजकारण आहे.
तुम्हाला मत द्यायचं असेल तर द्या... : नितीन गडकरी
मी लोकसभेत निवडून आलो पण मी लोकांना सांगितलं माझ्या हिशोबाने राजकारण चालेल, तुमच्या हिशोबाने नाही. तुम्हाला मत द्यायचं असेल तर द्या, नाही द्यायचं असेल तरी चालेल. जो मत देईल त्याचे काम करेल, जो नाही देईल त्याचेही काम करेल. त्यामुळे जनता जातीयवादी नाही तर पुढारी जातीवादी आहेत, हे पुढारी आपल्या स्वार्थासाठी जात उभी करतात असेही नितीन गडकरी म्हणाले.