याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, केईएम रुग्णालयाच्या आवारातील वसतिगृह आणि नर्सिंग कॉलेजच्या इमारत जीर्ण झाल्यामुळे, महानगरपालिका प्रशासनाने गेल्या वर्षी दुरुस्तीसाठी ती रिकामी केली होती. या इमारतींमध्ये राहणाऱ्या 150 नर्सिंग विद्यार्थ्यांना महानगरपालिकेच्या भोईवाडा शाळेत आणि 150 विद्यार्थ्यांना सीव्हीटीएसच्या नर्स क्वार्टरमध्ये हलवण्यात आलं. मात्र, याठिकाणी त्यांचे प्रचंड हाल होत आहेत.
मुंबईकरांनो लक्ष द्या! प्रभादेवी पूल बंद केल्याचा थेट फटका प्रवाशांना; एसटीच्या तिकीट दरात वाढ
advertisement
भोईवाडा शाळेच्या इमारतीत राहणाऱ्या एका नर्सिंग विद्यार्थिनीने नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली की, पूर्वी वसतिगृहाच्या एका खोलीत फक्त दोन विद्यार्थी राहत होत्या. आता महानगरपालिकेच्या शाळेत 16 विद्यार्थ्यांना एकाच खोलीत राहावं लागत आहे. शाळेतील वर्गखोल्या घाईघाईने वसतिगृहात रूपांतरित करण्यात आल्या. यामध्ये पुरेशा सुविधा नाहीत. कपड्यांसाठी कपाट, पिण्याचं पाणी आणि बेडची देखील व्यवस्था नाही. इमारतीची लिफ्ट देखील अनेकदा बंद असते.
नोबल नर्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षा कल्पना गाजुला म्हणाल्या की, "भोईवाडा येथील पाच मजली इमारतीत चार मजल्यांवर विद्यार्थ्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या इमारतीत प्रथम वर्षाचे 50 विद्यार्थी आणि द्वितीय वर्षाचे 200 विद्यार्थी राहतात. पिण्याच्या पाण्याची आणि जेवणाची व्यवस्था नसल्याने विद्यार्थी नाराज आहेत. या संदर्भात रुग्णालयाच्या डीन डॉ. संगीता रावत यांच्याकडेही तक्रार करण्यात आली आहे. डॉ. रावत यांनी इमारतीची पाहणी करण्याचं आश्वासन दिलं आहे.