कसा घडला अपघात?
कासा डहाणू राज्यमार्गावरील वधना येथे दुपारच्या सुमारास खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅजिक आणि पीकअप वाहनात समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर सहाजण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दोन्ही भरधाव वाहनांवरील चालकांचा ताबा सुटल्याने एका वळणावर हा भीषण अपघात झाला असून या अपघातात दोन्ही वाहनांचा चक्का चूर झाला. या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून जखमी झालेल्या सहा ते सात जणांवर कासा उपजिल्हा रुग्णालय तसच डहाणू ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
advertisement
वाचा - गावी निघाला आहात तर बस स्थानकावर सावध राहा, मुंबईत घडली धक्कादायक घटना
दोन्ही खाजगी वाहनांमध्ये प्रवास करणारे प्रवासी हे मजूर असून ते दिवाळीनिमित्त घरी परतताना हा अपघात झाल्याचं समोर येत आहे. डहाणू कासा महामार्गावर सूचना फलकांचा अभाव आणि धोकादायक असलेली वळण यामुळे या महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागासह पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय. पालघरच्या ग्रामीण भागात खाजगी वाहनांमधून अवैधरित्या मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असताना देखील आरटीओ विभाग ही याकडे दुर्लक्ष करत असल्याने स्थानिक नागरिकांना जीव गमवावा लागत असल्याची प्रतिक्रिया प्रत्यक्षदर्शनीकडून व्यक्त करण्यात येत आहे.
