जालना : राज्यात मागील 2 दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळालं. आता मात्र 13 जुलैपासून राज्यात पुन्हा एकदा पाऊस जोर धरणार आहे. 12 जुलैसाठी राज्यातील 5 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर 13 जुलैसाठी संपूर्ण कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
पुढील 24 तासांमध्ये कोकणातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळ ठिकाणी हवामान विभागाने मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. विदर्भामध्ये देखील वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. राज्यात उद्या 13 जुलै रोजी हवामानाची स्थिती काय राहील, हे आपण जाणून घेऊयात.
advertisement
कल्याणमधील असं दुकान, जिथं कायम असतो सेल; इथल्या ड्रेसेसला महिलांची खूपच पसंती
मुंबईत मागील 24 तासांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली. तर पुढील 24 तासात मुंबईतील आकाश ढगाळ राहून तुरळ ठिकाणी मुसळधार ते अतिवव मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना 12 आणि 13 जुलै साठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
तुम्हीही बसल्या बसल्या पाय हलवता? आजच सुधारा ही सवय, नेमकं काय आहे यामागचं कारण?
उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर दक्षिण मध्य महाराष्ट्रात मात्र पुढील दोन दिवस पावसाची कुठलीही शक्यता नाही. मराठवाड्यात देखील पुढील 2 दिवस कुठलाही अलर्ट देण्यात आलेला नाही. त्यानंतर मात्र मराठवाड्यातील पावसाचा जोर देखील वाढणार आहे.
विदर्भामध्येही सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विशेषतः पूर्व विदर्भात पावसाचा जोर हा अधिक असणार आहे. नागपूर, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर अधिक असेल.