नालासोपाऱ्याच्या सत्पाळा राजोडी रस्त्यावर एका भरधाव एसयूव्ही कारने रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या एका वेठबिगारी करणाऱ्या महिलेला जोरदार धडक दिली. त्यात त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. नवशी बसवत (वय 65 वर्षे) असं मृत महिलेचं नाव आहे. ती सत्पाळा नाका ग्रामपंचायत कार्यालयामागे राहत होती. शनिवारी संध्याकाळी राजोडी रान इथून कामावरून सुटल्यानंतर ती आणखी एका महिलेसोबत राजोडी भीमनगर येथील रस्त्यावरून सत्पाळा येथील घरी जात होती. तेव्हा कारने तिला जोरदार धडक दिली. त्यात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
advertisement
रात्री 3 वाजता मंदिरातून येऊ लागला विचित्र आवाज; बघायला गेले लोक, दृश्य पाहून हादरले
महिलेला धडकल्यानंतर कारचालक पळून जात होता. पण स्थानिक ग्रामस्थांनी त्याला पकडलं. त्याच्यासह गाडीत आणखी एक प्रवासी होता. ग्रामस्थांनी दोघांनाही पकडून बेदम मारहाण केली. संतप्त जमावाने गाडीचीही तोडफोड केली.अर्नाळा सागरी पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. अर्नाळा पोलीस ठाण्यात याप्रकरणी चालक कुलदीप मिश्रा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगरात ट्रक-दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज परिसरात असलेल्या गरवारे कंपनी जवळ ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. संभाजीनगर पुणे महामार्गावर वाळूज परिसरात एका भरधाव ट्रकने दुचाकी वरून जाणाऱ्यास पाठीमागून जोरदार धडक दिली.
Shocking! इंजिन सुरू ठेवून चालक चहा प्यायला उतरला; ट्रेन चालकाशिवायच धावू लागली, अन् 84 KM नंतर...
या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. आय्युबखान पठाण असं मृत तरुणाचं नाव आहे, तो मनीषानगर, वाळूजचा राहणारा होता. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकास ताब्यात घेतलं आहे.
