पंचायतन मंदीर खोपोली शहरात नाही. हे मंदिर रायगड जिल्ह्यात असून मुंबई आणि पुण्याहून येथे सहज जाता येते. मंदिरात पाच देवतांची (गणपती, साईबाबा, शिवलिंग, मारुती आणि विठ्ठल) स्थापना करण्यात आली असून या मंदिरात प्रवेश केल्यास निसर्गरम्य वातावरण आणि शुद्ध हवा आणि पवित्रता जपलेली वास्तू इथे बघायला मिळेल. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून एक दिवसाचा विसावा घ्यायचा असेल तर या ठिकाणी नक्कीच भेट देऊ शकता. इथे चहा प्रसाद म्हणून दिला जातो. मुख्य गोष्ट म्हणजे, इथे वडापाव सुद्धा फक्त 10 रूपयाला मिळतो.
advertisement
10 रूपयामध्ये मिळणारा वडापाव एकदम चविष्ट मिळत असल्याने इथे भेट देणारे पर्यटक आणि भाविक जेवण किंवा नाश्ता बाहेरून आणत नाहीत. गाड्यांच्या पार्किंगपासून ते मंदिराच्या कोणत्याही ठिकाणी भेट द्या सर्व काही मोफत आणि हव्या तेवढ्या वेळात आपण फिरू शकतो. पहाटे 5 वाजता सुरू होणारे हे मंदिर रात्री 9 वाजता बंद केले जाते. जर तुम्हाला एक दिवस राहून दुसऱ्या दिवशी रिटर्न जायचं असेल तर निवासी सोय फ्री मध्ये आहे. तसेच अपंग व्यक्तीसाठी सायकलची सोय, पिण्याच्या पाण्याची सर्व सोयीसुविधा या ठिकाणी मोफत आहेत. यामुळे हे ठिकाण कमी खर्चात सर्वजण एन्जॉय करू शकतात. याचा फायदा लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना होतो.
त्यामुळे फॅमिली किंवा मित्रमंडळी एक दिवसाचा बाहेर जाण्याचा प्लॅनिंग करत असाल तर हे ठिकाण अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य आहे. त्यामुळे शिर्डी किंवा तुळजापूर, गणपतीदर्शन किंवा इतर देवस्थानी फिरण्यासाठी आपला वेळ फुकट न घालवता या ठिकाणी गेलात तर पाच देवांचे दर्शन आरामात आणि व्यवस्थित भेटून जाते. हे पाच मंदिर एकाच ठिकाणी सुटसुटीत असल्याने पर्यटकांना आकर्षित करण्याचे ठिकाण बनले आहे. त्यामुळे मुंबईसारख्या ठिकाणी जर तुम्ही फिरण्याचा विचार करत असाल तर या ठिकाणी नक्कीच भेट द्या. कमी खर्चात पूर्ण फॅमिली एन्जॉय करू शकते.