शेवगाव पाथर्डी मतदारसंघांमध्ये भाजपाच्या उमेदवार मोनिका राजळे यांच्या प्रचारार्थ सभेत भाजप नेत्या पंकजा मुंडे बोलत होत्या. यावेळी सभेत पंकजा मुंडे यांनी डबल इंजिनचे हेलिकॉप्टर मिळत नसल्याची खंत बोलून दाखवली.
मी सभांची यादी केली तेव्हा मोनिका यांना म्हटलं, भाजपकडून यंदा हेलिकॉप्टर नाही आहे तेव्हा काय करावं.मी हे
जे उडतय (ड्रोन) अशा हेलिकॉप्टरमध्ये बसून आले. मी सिंगल इंजिनच्या हेलिकॉप्टरमध्ये जीव मुठीत धरून आले.
advertisement
डबल इंजिनच हेलिकॉप्टर मिळाल नाही त्यामुळे सिंगल इंजिन हेलिकॉप्टरमध्ये बसून महायुतीचा एक एक उमेदवार निवडून यावा. सभा कॅन्सल होऊ नये यासाठी प्रचार करतेय .आणि मी म्हणाले तर तुम्ही मला हेलिकॉप्टर ही घेऊन द्याल असं म्हणत पंकजा मुंडे यांनी डबल इंजिनचे हेलिकॉप्टर मिळत नसल्याची खंत व्यक्त केली.
महायुतीच्या एक उमेदवार निवडून यावा सभा कॅन्सल होऊ नये यासाठी मी प्रचार करत आहे डबल इंजिनचं हेलिकॉप्टर मला मिळालं नाही तरी सिंगल इंजिनचं हेलिकॉप्टर मधून मी किती ऊन आहे आणि त्या उन्हापासून संरक्षण करत मी प्रवास करत आहे असं म्हणत असलेल्या पंकजा मुंडे यांचा व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे. तर सायंकाळी केज या ठिकाणी झालेल्या सभेमध्ये हेलिकॉप्टर संदर्भात बोलताना त्या हेलिकॉप्टरचा आवाज येतोय तरीदेखील मी त्रास होत असताना फिरत आहे मी म्हणाले तर तुम्ही मला हेलिकॉप्टर घेऊन द्याल असेही असं जाहीर सभेत पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. पंकजा मुंडे यांच्या या विधानाची आता चर्चा रंगली आहे.
राज्यातील साखर कारखाने अद्याप व्यवस्थित सुरू झालेले नाहीत. त्यामुळे ऊस तोडणी कामगारांनी आधी मतदान करावे त्यानंतरच ऊस तोडणीच्या कामाला जावे. मला ऊसतोडणी महामंडळ मिळाले की तुमच्यावर काही मागायची वेळ येणार नाही, असे सांगत भाजपच्या नेत्या आमदार पंकजा मुंडे यांनी महामंडळासंबंधीचीही इच्छा बोलून दाखविली आहे. मतदान करा आणि मगच जा यासाठीच मी कवितेला धार लावून ठेवा असे बोलले होते मात्र त्याचा अर्थ काही जणांनी वेळेस लावला असेही त्याहून आल्या या मतदारसंघात ऊस तोडणी कामगारांची संख्या जास्त आहे.या मतदारसंघात मुंडे यांनी त्यांना साद घालत महायुतीच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले आहे.
