याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मेट्रो 2 अ' मार्गिकेवरून 4 लाख 7 हजार प्रवासी आणि तर मेट्रो 7 मार्गिकेवरून 5 लाख 29 हजार प्रवासी दररोज प्रवास करतील, असा दावा 'एमएमआरडीए'कडून केला जात होता. यानुसार, दोन्ही मेट्रो मार्गिकांवर मिळून दररोज 9 लाख 36 हजार प्रवासी अपेक्षित होते. मात्र, अद्याप प्रवासी संख्या 3 लाख 40 हजारांच्या घरात आहे. त्यामुळे अपेक्षित प्रवासी संख्या गाठण्यासाठी या मेट्रो मार्गिकेला आणखी मोठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
advertisement
'एमएमएमओसीएल'ने केलेल्या दाव्यानुसार, या मेट्रोवर 16 सप्टेंबर रोजी एका दिवसात 3 लाख 40 हजार प्रवाशांनी प्रवास केला. 'मेट्रो 2 अ' आणि 'मेट्रो 7' मार्गिकेने 18 जून रोजी प्रवासी संख्येचा 2 लाख 94 हजारांचा आकडा पार केला होता. तर 8 जुलैला पहिल्यांदा 3 लाख 1 हजार 127 हजारांचा टप्पा गाठला होता. त्यानंतर दोन महिन्यांतच आता जवळपास 40 हजार जास्त प्रवासी मेट्रोकडे वळले आहेत.
प्रवासी संख्या वाढल्याने 'एमएमएमओसीएल'च्या उत्पन्नातही वाढ झाली आहे. मेट्रो प्रवासी वाढत असल्यामुळे 'एमएमआरडीए'कडून या मार्गिकेवर अतिरिक्त गाड्या दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दोन गाड्यांतील अंतर घटले असून, प्रवाशांचा प्रवास जलद झाला आहे.