अकोल्यातील सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते.ज्या विदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी सभा घेत आहेत. त्या विदर्भात अर्ध्याहुन अधिक मतदार संघात काँग्रेस आणि भाजपात थेट लढत होतेय. त्यामुळेच पंतप्रधान मोदी यांनी ठाकरे, पवारांवर टीका न करता काँग्रेसचाच खरपूस समाचार घेतलाय.
काँग्रेसने बाबा साहेबांचा अपमान केलाय. काँग्रेस आदिवासी,दलित आणि ओबीसींमध्ये भांडण लावत आहे,असा गंभीर आऱोप देखील पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर लावला आहे. तसेच पंतप्रधान मोदी यांनी यावेळी काँग्रेसला आव्हान देखील दिले आहे. शाही पवाराला आव्हान देतो, यांच्या चार चार पिढ्यांनी राज्य केले. यांनी बाबासाहेबांना पचंतिर्थावर जाऊन श्रद्धांजली दिली आहे का? मी बाबासाहेबांना अभिवादन करून आलो आहे.साध्या दिल्लीतल्या बाबासाहेबांच्या तिर्थावर हा परिवार गेला नाही, अशी टीका देखील मोदींनी काँग्रेसवर केली.
advertisement
आम्ही काश्मिरात 370 ची भिंत तोडली आणि पुन्हा संविधान लागून केलं. पण आता काँग्रेसने 370 लागू करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे काँग्रेसची ही भूमिका काश्मिरला पुन्हा हिंसेत ढकलण्यासारखे आहे, असाही हल्ला मोदींनी काँग्रेसवर चढवला.