TRENDING:

महाराष्ट्रात चाललंय काय? पोलिसानेच आपल्या बायकोवर केला गोळीबार, जागीच मृत्यू

Last Updated:

हिंगोलीमध्ये कायद्याचं रक्षण करणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या पत्नीवर गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. या गोळीबारात पत्नीचा मृत्यू झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मनीष खरात, प्रतिनिधी
हिंगोलीमधील घटना
हिंगोलीमधील घटना
advertisement

हिंगोली : महाराष्ट्रात कायद्याचा धाक आहे की नाही, असा सवाल उपस्थितीत केला जात आहे. हिंगोलीमध्ये कायद्याचं रक्षण करणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या पत्नीवर गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. या गोळीबारात पत्नीचा मृत्यू झाला आहे. तर सासू आणि  मेव्हणा गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केलं आहे.

advertisement

मिळालेल्या माहितीनुसार,   हिंगोली शहरातील प्रगतीनगर भागात ही घटना घडली आहे. या भागात राहणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या पिस्तुलीतून आपल्या पत्नीवर गोळीबार केला. यामध्ये पत्नी ठार झाली आहे. ही घटना कौटुंबिक वादातून घडली असल्याची माहिती पुढे येत आहे. विलास मुकाडे असं पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव असून तो वसमत शहर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. त्याच्या मयत पत्नीचे नाव मयुरी विलास मुकाडे आहे.  या गोळीबारात विलास मुकडेची सासू वंदना धनवे आणि मेहुणा योगेश धनवे जखमी झाला आहे.

advertisement

मेहुणा गंभीर जखमी असून तर सासू देखील गंभीर जखमी आहे. दोघांनाही हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात जखमीना उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले आहेत. दरम्यान, हा कर्मचारी वसमत शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. त्याने हे कृत्य का केलं, याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. पोलीस या घटनेचा तपास करत आहे. गोळीबाराच्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
महाराष्ट्रात चाललंय काय? पोलिसानेच आपल्या बायकोवर केला गोळीबार, जागीच मृत्यू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल