प्राडा सारख्या कंपनीने कोल्हापुरी चप्पल सारखं पादत्राण समोर आणल्यानंतर एकच खळबळ उडाली. आता प्राडा कोल्हापुरी चप्पलच्या मुळावर उठेल आणि आपल्या नावावर ते खपवेल असे वातावरण निर्माण झाल्याने काहीशी भीतीही चप्पल विक्रेत्यामध्ये पसरली. मात्र, कोल्हापुरी चप्पलचे क्रेडिट कोल्हापूरच्या व्यवसायिकाना मिळावे यासाठी चेंबर ऑफ कॉमर्सने थेट प्राडाशी संवाद साधला आणि प्राडाने आपली चूक करत कोल्हापूरच्या चप्पल व्यावसायिकांशी संवाद साधण्याची तयारी दाखवली. प्राडासारखी कंपनी कोल्हापूरच्या चप्पल समोर झुकल्याने या चप्पल बाबत उत्सुकता वाढीला लागली आहे. त्यामुळे अनेक जण ई-कॉमर्स वेब साईटवर चप्पलची माहिती घेत असून त्यातून अंतरराष्ट्रीय मार्केट मध्ये कोल्हापुरी चप्पलची चलती सुरू आहे.
advertisement
कोल्हापूरच्या पर्यटनाला येणाऱ्या लोक हमखास नेहमी कोल्हापुरी चप्पल खरेदी करतात. यासाठी विशेष अशी चप्पल लाईन कोल्हापुरात आहे. तिथेही आता गर्दी दिसून येत आहे. प्राडामुळे कोल्हापूरची ऐटदार चप्पल चांगलीच चर्चेत आहे. या चर्चेमुळे कोल्हापुरी चप्पलची उत्सुकता वाढली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत याचा फायदा झाला असला तरी स्थानिक बाजारपेठेत मात्र तितका दिसून येत नसल्याचे स्थानिक विक्रेते सांगतात.
कोल्हापूरची चप्पल ही अगोदरच जगप्रसिद्ध आहे. त्यात या नव्या वादामुळे त्याचा पॉझिटीव्ह परिणाम कोल्हापुरी चप्पल वर झाला आहे. प्राडाला सुद्धा आता कोल्हापूरच्या विक्रेत्यांना सोबत घेतल्या शिवाय चप्पल विकणे अवघड होणार आहे. टप्यात आला मी करेक्ट कार्यक्रम करण्याचा स्वभाव असलेल्या कोल्हापुरकरांनी प्राडाला टप्प्यात घेऊन फायदा करून घेतला आहे. आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसोबत स्थानिक बाजारपेठेला याचा बुस्ट मिळतो का हेच पाहणे महत्वाचे असेल
