प्रताप सरनाईक आज माध्यमांशी बोलत होते.यावेळी त्यांनी राजू पाटलांच्या टीकेवर उत्तर दिले. काल झालेला दहीहंडीनंतर काही लोक ट्यू ट्यू बोलायला लागलेत. या लोकांना जनतेने नाकारलं नाही लाथाडलय अशा शब्दात प्रताप सरनाईक यांनी राजू पाटलांवर टीका केली आहे. तसेच ज्या लोकांचा गोविंदाशी काही संबंध नाही ते लोक यावरती बोलतायत. गेले 29 वर्षापासून मी दहीहंडीचा आयोजन करतोय.गोविंदा पथकाला प्रताप सरनाईकनेच जागतिक पातळीवर नेण्याचा काम केलं. तुम्ही ज्यावेळी आमदार होतात त्यावेळी तुम्ही काय केलात,असा सवालही त्यांनी राजू पाटलांना केला.
advertisement
जर आमच्यात (जय जवान गोविंदा पथकमध्ये) नाराजी असती तर आम्ही आधीत त्यांना आधीच सांगितलं असतं तुम्ही प्रताप सरनाईक यांच्या दहीहंडीला येऊ नका. जय जवान गोविंद पथक आमचा कुटुंब आहे.ह्या कुटुंबाला मोठा करण्यासाठी अनेक वर्षापासून आम्ही स्वतः पाठपुरावा केला आहे.आमच्या आणि जय जवान गोविंदा पथकामध्ये कोणी वाद आणण्याचा प्रयत्न करू नये, असेही प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
तसेच एक तर आम्ही आयोजन करायचे आणि दुसऱ्या दिवशी त्यावर ते राजकारण व्हायचा असा चिल्लर लोकांना मी उत्तर देत नाही़ अशी नाव न घेता प्रताप सरनाईक यांनी राजू पाटलांवर टीका केली.
राजू पाटील काय म्हणाले होते?
मराठी माणसांच्या मेळाव्यात दोन्ही ठाकरे बंधूंना ‘जय जवान दहिहंडी पथक’ या पथकाने मराठी माणसांचे आशास्थान म्हणून सलामी दिली होती. याचाच राग धरून काही भैय्यांची तळी उचळणारे गांडूळ वळवळले होते व आकसापोटी त्यांना एका स्पर्धेत प्रवेश नाकारण्याचा नीच राजकारण केले होते. आज पण ठाण्यात एका गोविंदा पथकाने ‘त्यांच्या’ इथे पहिल्यांदा १० थर लावले, त्या गोविंदा पथकाचे मनापासून अभिनंदन केलेच पाहिजे. परंतु इथेही यांच्या राजकारणाचे गांडूळ वळवळले व या विजयी पथकाचा नामोल्लेख करताना अप्रत्यक्ष जय जवान गोविंदा पथकाला टोला मारला. आज त्याच जय जवान गोविंदा पथकाने एकदा नाही चक्क तीन वेळा १० थर लावून एकाच दिवसात हॅट्रिक मारली व या गांडूळांना माती दाखवली. जय जवान गोविंदा पथकातील सर्व मित्रांचे व त्यांच्या पाठी खंबीरपणे उभा राहणाऱ्या आमच्या अविनाश जाधवांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.संस्कार व ‘संस्कृती’ ही वागण्यात असली पाहिजे……नुसत्या नावात काय आहे ?