चंद्र ग्रहणाची वेळ
चंद्रग्रहण 7 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजून 57 मिनिटांनी सुरू होईल आणि 8 सप्टेंबर रोजी पहाटे 1 वाजून 26 मिनिटांनी संपेल. पूर्ण चंद्रग्रहणाचा टप्पा रात्री 11 वाजून 42 मिनिटे ते 12 वाजून 47 मिनिटांच्यादरम्यान असेल. या वेळेत चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या छायेत झाकला जाईल व लालसर रंगाचा दिसेल.
advertisement
गरोदर स्त्रियांसाठी ग्रहण काळातील नियम
1) गरोदर स्त्रियांनी ग्रहणकाळात घराबाहेर पडणे टाळावे. या काळात नकारात्मक उर्जेचा गर्भावर परिणाम होतो, असं मानलं जातं.
2) धारदार वस्तू (सुई, सुरी, कात्री) वापरू नयेत.
3) ग्रहणकाळात मलमूत्र विसर्जन टाळावे, कारण परंपरेनुसार हा काळ अशुद्ध मानला जातो.
4) ग्रहण सुरू असताना काहीही खाणे-पिणे टाळावे. देवाचं नामस्मरण, मंत्रजाप, शांत ध्यान करणे लाभदायी असते.
लहान मुलं, वृद्ध व आजारी व्यक्तींसाठी ग्रहणकाळातील नियम
1) लहान मुलांनी ग्रहणकाळात घराबाहेर पडू नये.
2) वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी या काळात विश्रांती घ्यावी. परंतु, झोपी जाऊ नये.
3) खाणे-पिणे किंवा मलमूत्र विसर्जन टाळावे.
4) ग्रहण संपल्यानंतर स्नान करूनच अन्नग्रहण करावे, यामुळे शुद्धता राखली जाते.
शास्त्रज्ञांच्या संशोधनानुसार, जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत एकत्र येतात तेव्हा तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण दिसते. धार्मिक दृष्टिकोनातून मात्र, ग्रहणाची घटना शुभ मानली जात नाही. त्यामुळे असं मानलं जातं की, ग्रहणाच्या वेळी काही विशेष गोष्टींची काळजी घेतली तर या ग्रहणाचा कुटुंबाच्या आणि व्यक्तीच्या जीवनावर वाईट परिणाम होत नाही. पण, महत्त्वाच्या गोष्टी लक्षात न ठेवल्यास त्याचा वाईट परिणाम होतो.