TRENDING:

Accident News : ओव्हरटेकच्या नादात ट्रकने मॅक्स ऑटोला हवेत उडवलं, गाडीचा झाला चक्काचूर, भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू

Last Updated:

Pune Accident News : पुण्यातून एक अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका भरधाव आयशर ट्रकने मॅक्स ऑटोला भीषण धडक दिल्याची घटना घडली आहे. ही धडक इतकी भीषण होती की मॅक्स ऑटो अक्षरश हवेत उडाली होती.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Pune Accident News : पुण्यातून एक अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका भरधाव आयशर ट्रकने मॅक्स ऑटोला भीषण धडक दिल्याची घटना घडली आहे. ही धडक इतकी भीषण होती की मॅक्स ऑटो अक्षरश हवेत उडाली होती. आणि समोरच उभ्या असलेल्या एसटीवर धडकली होती. या भीषण अपघातात आता 9 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे,तर 7 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. या घटनेनंर आरोपी आयशर ट्रक चालक फरार झाला आहे. पोलिस या आरोपीचा शोध घेत आहेत. दरम्यान या घटनेची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली असून मृतांना पाच लाखाची मदत जाहीर करण्यात आली आहे.
Pune accident News
Pune accident News
advertisement

मिळालेल्या माहितीनुसार,  पुणे नाशिक महामार्गावरील नारायणगाव जवळ आज सकाळी 10.30 च्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेत आयशर टेम्पो प्रवासी वाहतूक करणारी मक्झिमो गाडी आणि एसटीमध्ये विचित्र अपघात झाला यात नऊ जण ठार असून 7 जण गंभीर जखमी आहेत. यामध्ये मृतांचा आकडा देखील वाढण्याची शक्यता आहे.

खरं तर या घटनेतील एसटी बस ब्रेक फेल झाल्याने रस्त्याच्या कडेला उभी होती. त्याचवेळी त्याच्यामागून प्रवाशांची वाहतूक करणारी एक मॅक्स ऑटो येत होती. या मॅक्स ऑटोच्या मागून येणाऱ्या एका भरधाव आयशर ट्रकने मॅक्स ऑटोला धडक दिली होती. ही धडक इतकी भीषण होती की मॅक्स ऑटो अक्षरश हवेत उडून थेट उभ्या असलेल्या बसवर धडकली होती. या घटनेने महामार्गावर खळबळ माजली होती.

advertisement

आयशर आणि बसच्या मध्ये मॅक्झिमा गाडीचा चक्काचूर झाला आणि त्यामधील 11 प्रवाशांमधील 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी आहे. या घटनेनंतर त्तकाळ नागरीकांनी धाव घेऊन रुग्णांना रुग्णालयात दाखल केलं आहे.सध्या जखमींवर उपचार सूरू आहेत.

दरम्यान या घटनेत आयशर टेम्पो हा ओव्हरटेकच्या प्रयत्नामध्ये असताना त्याची धडक मॅक्झिमो गाडीला लागल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत आहे. या घटनेनंतर महामार्गावर मोठी खळबळ उडाली होती. तसेच घटनेनंतर काही काळ वाहतुक कोंडी झाली होती. मात्र वाहने हटवून वाहतूकीला मार्ग मोकळा करून देण्यात आला आहे.

advertisement

advertisement

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 5 लाखाची मदत

पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगाव जवळ झालेल्या भीषण अपघातात 9 कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना करतो. मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक सहाय्य मुख्यमंत्री सहायता निधीतून करण्यात येईल. जखमींच्या उपचाराची योग्य काळजी घ्या, असे मी पुणे पोलिस अधीक्षक यांना सांगितले आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Accident News : ओव्हरटेकच्या नादात ट्रकने मॅक्स ऑटोला हवेत उडवलं, गाडीचा झाला चक्काचूर, भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल