TRENDING:

Pune Indrayani River : इंद्रायणी कुंडमळा पूल अपघात, रात्रभर सुरू असलेले बचाव कार्य थांबवले, कारण आलं समोर

Last Updated:

Pune Acciedent News : मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमळा इथं इंद्रायणी नदीवरील जूना पूल कोसळला. रात्रभर सुरू असलेले बचाव कार्य एनडीआरएफने आज सकाळी थांबवले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अभिजीत पोते,  प्रतिनिधी, मुंबई: मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमळा इथं इंद्रायणी नदीवरील जूना पूल कोसळला. या अपघातात काही पर्य़टक वाहून गेले, त्यातील 51 पर्यटकांना NDRFच्या टीमनं रेस्क्यू केले आहे. तर, चौघांचा मृत्यू झाला असून यात 3 पुरुष आणि एका 6 वर्षीय बालकाचा समावेश आहे.जखमींवर तळेगावातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रात्रभर सुरू असलेले बचाव कार्य एनडीआरएफने आज सकाळी थांबवले.
News18
News18
advertisement

पावसाळ्यात इंद्रायणी नदी जवळील कुंडमळ्यात पर्यटक नेहमी गर्दी करत असतात. रविवार असल्यामुळं दुपारी तीनच्या सुमारास पर्यटकांनी गर्दी केली होती.. काही जण पुलावर उभे होते यावेळी अचानक पूल कोसळला.त्यानंतर काहीजण नदीत पडले आणि वाहून गेले. याची माहिती मिळताच बचाव पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचलं आणि युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले. मात्र पर्यटक जर नेहमी इथं येत असतात मग त्यांच्या सुरक्षेसाठी इथं कोणत्याही उपाययोजना का नव्हत्या असा सवाल विरोधकांकडून केला जात आहे.

advertisement

41 पर्यटाकांना NDRFच्या टीमकडून रेस्क्यू करण्या आले. तर, अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला. जखमींवर तळेगावातील रुग्णालयात उपचार करण्यात आले. किरकोळ जखमी असलेल्यांना प्राथमिक उपचारानंतर घरी जाऊ देण्यात आले. तर, प्रकृती गंभीर असणाऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू होते.

दरम्यान, काल रात्री कुंडमळा पुलाचा नदीत पडलेला लोखंडी सांगाडा नदीपात्रातून दूर करण्यात आला होता. ही दुर्घटना घडली तेव्हा कुंडमळा पुलावर तब्बल 100 जण असल्याचे सांगितले जाते. यापैकी तब्बल 50 जणांना बाहेर काढण्यात आले.

advertisement

एनडीआरएफने बचाव कार्य थांबवले...

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अतिवृष्टीचा फटका, बबन यांच्या सीताफळाचे मोठं नुकसान, खर्च निघणे झालं अवघड
सर्व पहा

एनडीआरएफने आज सकाळी बचाव कार्य थांबवले असल्याचे सांगितले. पूल तुटल्याने इंद्रायणी नदीच्या प्रवाहात पडलेल्या 51 जणांची सुटका करण्यात आली. त्यामुळे आता प्रशासनाच्या आदेशानंतर बचाव मोहीम थांबवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.  घटनास्थळी आज दुपारी ड्रोनच्या साहाय्याने हवाई सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. अपघाताबाबत अधिक माहिती घेण्यासाठी आणि कोणी पर्यटक नदीच्या प्रवाहात अडकला नसल्याची खात्री करण्यासाठी हवाई सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pune Indrayani River : इंद्रायणी कुंडमळा पूल अपघात, रात्रभर सुरू असलेले बचाव कार्य थांबवले, कारण आलं समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल